कोरोनिल किट किंमत: पतंजलीने लाँच केलं कोरोनावरील औषध, जाणून घ्या किती आहे किंमत

Patanjali's Ayurvedic medicine for covid 19 Launching: बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची पतंजली कंपनी आज कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठीचं  आयुर्वेदिक औषध लाँच करणार आहेत.

Acharya_Balkrishna_Baba_Ramdev
कोरोनिल किट किंमत  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आचार्य बालकृष्ण यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावरील औषध विकसित केल्याचा दावा केला होता
  • मंगळवारी दुपारी १२ वाजता हरिद्वारमध्ये पतंजली योगपीठ येथे लाँच केलं जाणार औषध
  • आयुर्वेद औषधाने कोरोना बरा करू शकतो, पतंजलीचा दावा  

हरिद्वार: कोरोनिल किट किंमत: कोरोना व्हायरसच्या संसर्गाने संपूर्ण जग त्रस्त असताना आता योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची पतंजली (Patanjali) कंपनी ही आज (२३ जून) कोरोनावर उपचार करणारं आपलं आयुर्वेदिक औषध बाजारात आणलं आहे. (Corona Medicine) हरिद्वारमधील पंतजली योग पीठ येथे एका विशेष कार्यक्रमात हे औषध आज लाँच करण्यात आलं आहे. दरम्यान, या औषधाची नेमकी किंमत (coronil patanjali kit price) काय असणार आहे याबाबतची सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं. मात्र, लाँचिंगदरम्यान याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, आता याविषयी माहिती मिळाली आहे. 

कोरोनिलची किंमत किती आहे? 

पतंजलीच्या कोरोना किटची किंमत (coronil patanjali tablet) काय असेल याबद्दल आता माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतजलीच्या कोरोनिल किट किंमत ही ५४५ रुपये (Rs. 545) असणार आहे. हे किट ३० दिवसांसाठी असणार आहे.  

कोरोनावरील औषध बनबिल्याचा अभिमान

बाबा रामदेव यांनी कोरोनिलच्या लाँचिंग दरम्यान असं म्हटलं की, 'आज आम्हाला अभिमान वाटतो की कोरोनाची पहिली आयुर्वेदिक, वैद्यकीय नियंत्रित, चाचणी, पुरावे आणि संशोधन आधारित औषध पतंजली रिसर्च सेंटर आणि NIMS यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालं आहे.'

बाबा रामदेव पुढे म्हणाले, 'सगळे जग या क्षणाची वाट पाहत होते की कुठे ना कुठेतरी या आजावर औषध येईल. आम्हाला अभिमान आहे की, पतंजलीने कोरोनावरील पहिले आयुर्वेदिक औषध विकसित केले आहे. नीम्सच्या संयुक्त प्रयत्नाने पतंजलीने हे औषध विकसित केले आहे. डॉ. बलवीरसिंग तोमर यांच्या टीमच्या सहकार्याने देशातील अनेक शहरांमध्ये या औषधाचं क्लिनिकल कंट्रोल स्टडी करण्यात आलं. ज्यामध्ये २८० रुग्णांचा समावेश होता. ज्यामध्ये शंभर टक्के रुग्ण बरे झाले. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल कंट्रोल चाचण्यांसाठी सहयोग केले.' असं बाबा रामदेव या कार्यक्रमात म्हणाले. 

3 दिवसात 69 टक्के आणि 7 दिवसात 100 टक्के पुनर्प्राप्ती दर

बाबा रामदेव म्हणाले की, औषध चाचणी दरम्यान कोणत्याही पेशंटचा मृत्यू झाला नाही. या औषधाचा तीन ते सात दिवसांचा रिकव्हरी रेट 100 टक्के आणि शून्य टक्के मृत्यूदर आहे. 3 दिवसांत औषधाच्या वापराने ६९ टक्के रुग्ण बरे झाले. सुमारे ५०० डॉक्टरांच्या पथकाने हे औषध विकसित करण्यासाठी रात्रंदिवस काम केले.सोमवारपासून औषध वितरणाचे काम सुरू होईल

सोमवारपासून(२९ जून) पतंजली 'ऑर्डर मी' नावाचे अॅप लॉन्च करेल आणि त्या माध्यमातून श्र्वसारी, अणुतेल आणि कोरोनिल हे औषध लोकांच्या घरी तीन दिवसात पोहोचवतील.

सोमवारी पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आचार्य बालकृष्ण यांनी ट्वीट केलं होतं की, 'कोरोनावरील एविडेंस बेस्ड प्रथम आयुर्वेदिक औषध श्वासारि वटी कोरोनिलचं संपूर्ण वैज्ञानिक दस्तऐवजासह पतंजली योगपीठ हरिद्वार येथे उद्या दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे.'  

५ ते १४ दिवसात रुग्ण बरे होण्याचा दावा

आचार्य बालकृष्ण यांनी याच महिन्यात काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, कंपनीने कोरोनावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषध विकसित केले आहे. या औषधाच्या सेवनामुळे रुग्ण ५ ते १४ दिवसात बरे होतील. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर आम्ही शास्त्रज्ञांची एक टीम नेमली. प्रथम एक सिम्युलेशन केले गेले आणि त्या संयुगांची ओळख पटवली जे या व्हायरसशी लढा देऊ शकतील. जे शरीरात त्याचा प्रसार रोखू शकतील. मग, आम्ही शेकडो पॉझिटिव्ह रूग्णांवर क्लिनिकल केस स्टडी केली आणि आम्हाला १०० टक्के अनुकूल परिणाम मिळाले.'

ते पुढे असं म्हणाले की, 'आमचे औषध घेतल्यानंतर कोरोनाचे रुग्ण ५ ते १४ दिवसांच्या कालावधीत बरे झाले आणि त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. म्हणून आम्ही म्हणू शकतो की, कोव्हि़ड-१९ वरील उपचार हे आयुर्वेदाच्या माध्यमातून शक्य आहे. आम्ही केवळ नियंत्रित क्लिनिकल चाचण्या घेत आहोत. आम्ही पुढील ४-५ दिवसांत यासंबंधी डेटा आणि पुरावे प्रकाशित करू.' याशिवाय पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील म्हणाले होते की, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लोकांनी योगासह चांगले व पौष्टिक भोजन केले पाहिजे.

भारतात अशी आहे कोरोनाची स्थिती 

सोमवारपर्यंत भारतात कोरोनाचे ४.२५ लाख रुग्णसंख्या होती. या व्हायरमुळे आतापर्यंत १३,६९९ लोकांचा बळी गेला आहे. मात्र, देशात मोठ्या संख्येने लोक बरेही झाले आहेत. सध्या भारतात रुग्ण बरे होण्याचा दर ५५.७७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी