Home Remedies for PCOS : बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजकाल लोक जीवनशैलीशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. पीसीओएस आणि पीसीओडी या समस्यांपैकी एक आहे. खराब जीवनशैलीमुळे अनेक महिला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीजला (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) बळी पडत आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल दिसून येतात, ज्यामध्ये महिलांच्या शरीरात पुरुष हार्मोन (टेस्टोस्टेरॉन हार्मोन) ची पातळी खूप वाढू लागते.
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि लठ्ठपणामुळे महिला अशा समस्यांना बळी पडत आहेत. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये ते अनुवांशिक देखील असू शकते. PCOS मध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
PCOD किंवा PCOS सारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही दालचिनीचे सेवन करू शकता. संशोधनानुसार दालचिनीचे सेवन केल्याने इन्सुलिनची पातळी कमी होते. तसेच, यामुळे लठ्ठपणा कमी होऊ शकतो. जर तुम्हाला पीसीओडीपासून मुक्ती मिळवायची असेल, तर नियमितपणे १ चमचा दालचिनी पावडर १ ग्लास कोमट पाण्यासोबत घेतल्यास पीसीओएसची समस्या बर्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
PCOS च्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने देखील फायदेशीर ठरू शकतात. त्याचे सेवन करण्यासाठी एका पातेल्यात १ ग्लास पाणी टाकून चांगले गरम करा. त्यानंतर या पाण्यात ७ ते ८ पुदिन्याची पाने टाका. आता हे पाणी सुमारे 10 मिनिटे उकळवा. त्यानंतर पाणी गाळून प्या. हे पाणी काही आठवडे सेवन केल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होऊ शकते. तसेच, शरीरातील अतिरिक्त केसांची वाढ रोखू शकते.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असलेल्या महिलांचे वजन खूप वेगाने वाढू शकते. अशा परिस्थितीत महिलांना मेथीचे सेवन केल्याने खूप फायदा होतो. मेथी शरीरातील ग्लुकोजच्या चयापचयाला चालना देते आणि त्यामुळे इन्सुलिनची पातळी कमी होते.
( Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.)