शेंगदाण्याचे बटर खा, कोलेस्टेरॉलची चिंता विसरा

peanut butter healthy butter for health, keep your heart healthy शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर तब्येतीसाठी लाभदायी आहे

peanut butter healthy butter for health, keep your heart healthy
शेंगदाण्याचे बटर खा, कोलेस्टेरॉलची चिंता विसरा 
थोडं पण कामाचं
  • शेंगदाण्याचे बटर खा, कोलेस्टेरॉलची चिंता विसरा
  • इतर बटरच्या तुलनेत पीनट बटरमध्ये सर्वात कमी फॅट्स
  • पीनट बटरमधील फॅट्स 'गुड कोलेस्टेरॉल'चे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त

मुंबईः वाढते वजन आणि हृदयाशी संबंधित कोणताही विकार जडला तर डॉक्टर सर्वात आधी खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवडीनिवडींची चौकशी करतात. फास्टफूड, जंकफूड, तेलात तळलेले पदार्थ, मैदा, बेकरी प्रॉडक्ट, फ्रीझर आणि डीप फ्रीझरमधील थंड पदार्थ तसेच बटर आणि चीज खाऊ नका असा सल्ला देतात. पण एक बटर आहे जे खाण्यासाठी डॉक्टरांचा विरोध दिसत नाही. अनेकदा या एकाच बटरला डॉक्टरांकडून विरोध होत नाही. नियमितपणे पण मर्यादीत प्रमाणात हे एक बटर खाण्यास डॉक्टर हरकत घेत नाहीत. आश्चर्य वाटले असेल वाचून. पण असे बटर आहे. हे आहे शेंगदाण्याचे बटर. इंग्रजी भाषेत याला पीनट बटर (Peanut butter) असे म्हणतात. (peanut butter healthy butter for health, keep your heart healthy)

शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर रक्तवाहिन्यांमध्ये 'बॅड कोलेस्टेरॉल'च्या (bad cholesterol) रुपात साठून राहात नाही. ते रक्ताच्या वहनातील अडथळा ठरत नाही. पीनट बटर रक्तवाहिन्यांसाठी पोषक असते. ते रक्तवाहिन्यांची लवचिकता दीर्घकाळ कायम राखण्यास मदत करते. यामुळे हृदयाशी संबंधित विकारांचा धोका कमी होण्यास मदत होते. 

जगात अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या बटरपैकी पीनट बटरमध्ये सर्वात कमी फॅट्स असतात. महत्त्वाचे म्हणजे हे फॅट्स रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहणारे फॅट्स नसतात. याच कारणामुळे डॉक्टर पीनट बटर खाण्यासाठी विरोध करत नाहीत पण इतर बटर खाणे टाळा असा सल्ला देतात. 

पीनट बटरमधील फॅट्स शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास तसेच 'गुड कोलेस्टेरॉल'चे (good cholesterol) प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदय व्यवस्थित कार्यरत राहते. 

पीनट बटरमध्ये ६० टक्के भाग हा शरीरासाठी लाभदायी असलेल्या पोटॅशिअमचा असतो. हे पोटॅशिअम शरीरातील रक्तप्रवाह आणि हृदयाची धडधड सुरळीत ठेवण्यासाठी लाभदायी आहे. रक्ताची जाडी प्रमाणपेक्षा जास्त वाढली अथवा कमी झाली तर तब्येतीसाठी हानीकारक असते. पीनट बटरचे सेवन नियमित केले तर रक्ताची जाडी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पोटॅशिअम शरीराला मिळते. मात्र पीनट बटरचे सेवनही मर्यादीत प्रमाणातच केले पाहिजे. अतिरिक्त प्रमाणात पीनट बटरचे सेवन हानीकारक ठरू शकते. याच कारणामुळे डॉक्टर मर्यादीत प्रमाणातच पीनट बटर खाण्याचा सल्ला देतात.

पीनट बटर म्हणजे चव आणि तब्येतीच्या हितासाठी उपयुक्त घटक यांचा उत्तम संगम आहे. या बटरला चांगली चव आहे. विशेष म्हणजे इतर बटरमुळे शरीराची जशी हानी होऊ शकते तशी हानी पीनट बटरमुळे होत नाही. हे तब्येत उत्तम राखण्यासाठी लाभदायी आहे. मर्यादीत प्रमाणात पीनट बटर खाणाऱ्यांना टाइप टू प्रकारचा मधुमेह होत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादीत राहते.

शेंगदाण्यापासून तयार केलेल्या पीनट बटरमध्ये ३० टक्के प्रोटीन असते. हे प्रोटीन शरीराची दैनंदिन कामांमुळे झालेली झीज भरुन काढते, अशक्तपणा दूर करते. पीनट बटरमधील प्रोटीन शरीरात अमिनो अॅसिडच्या रुपात त्वचेच्या पेशींची झीज भरुन काढते. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी