Peanut Butter: वजन घटवायचेय तर खा हे बटर

तब्येत पाणी
Updated May 13, 2022 | 12:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Peanut butter: पीनट बटर केवळ वजन वाढवण्यातच फायदेशीर नव्हे तर वजन घटवण्यातही फायदेशीर आहे. 

peanut butter
वजन वाढीसाठीच नव्हे तर वेट लॉसमध्येही फायदेशीर पीनट बटर 
थोडं पण कामाचं
  • पीनट बटरच्या सेवनाने दीर्घकाळ भूक लागत नाही.
  • एक चमचा पीनट बटरमध्ये साधारण १०० कॅलरीज असतात मात्र या कॅलरीज मोनो अनसॅच्युरेटेड फॅटच्या रूपात असात
  • पीनट बटर तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी खाऊ शकता कारण यावेळेस आपल्या शरीरास भरपूर जेवणाची गरज असते

मुंबई: फिटनेसच्या जगात पीनट बटरला(peanut butter) सुपरफूड मानले जाते. हाय प्रोटीन आणि हाय फायबर कंटेट असल्या कारणाने वर्कआऊटच्या(work out) आधी आणि त्यानंतर हे खाण्याचा सल्ला दिला जातो. टेस्टी असण्यासोबतच यामुळे पोटही भरते. वजन वाढवणाऱ्या लोकांमध्ये हे एक आवडते स्नॅक्स आहे. पीनट बटर(peanut butter) वजन वाढवण्यात फायदेशीर आहे हे तर  सगळ्यांनाच माहीत आहे मात्र पीनट बटरमुळे वजनही घटवता(weight loss) येते. जे लोक हा विचार करून पीनट बटर खातात की त्यामुळे वजन वाढेल तर त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे यामुळे वजन घटवताही येते. peanut butter is useful for weight loss

अधिक वाचा - या सोप्या पद्धतीने जाणून घ्या आंबा गोड आहे का आंबट

हेल्दी फॅट असते भरपूर

एक चमचा पीनट बटरमध्ये साधारण १०० कॅलरीज असतात मात्र या कॅलरीज मोनो अनसॅच्युरेटेड फॅटच्या रूपात असात. हे आपल्या बॉडीसाठी न केवळ फायदेशीरच असते तर दृदयाचे आजारांपासून बचावासाी आणि लठ्ठपणा दूर करण्यातही मदत होते. 

सतत भूक लागत नाही

पीनट बटरच्या सेवनाने दीर्घकाळ भूक लागत नाही. असे यासाठी कारण यात भरपूर प्रमाणात फायबर आणि फोलेट असते ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि सतत खाण्याची इच्छा होत नाही.

कधी खाल्ले पाहिजे पीनट बटर?

पीनट बटर तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी खाऊ शकता कारण यावेळेस आपल्या शरीरास भरपूर जेवणाची गरज असते. तुम्ही सकाळच्या वेळेस ब्रेड अथवा अॅपलवर पीनट बटर लावून खाऊ शकता. याशिवाय वर्कआऊट करण्याआधी अथवा नंतर पीनट बटर खाल्ले पाहिजे कारण यामुळे एनर्जी लेव्हल मेंटेन ठेवण्याचे काम करतात. 

अधिक वाचा - अशी मिळवा शुक्र संक्रमणाच्या वाईट प्रभावापासून मुक्ती

कसे खावे पीनट बटर?

  1. पीनट बटर तुम्ही सकाळच्या स्मूदीसह खाऊ शकता. 
  2. सलाडमध्येही तुम्ही एक चमचा पीनट बटर खाऊ शकता. 
  3. ब्रेड अथवा चपातीसोबतही तुम्ही पीनट बटर खाऊ शकता. 
  4. दलिया अथवा ओट्ससोबत तुम्ही पीनट बटरचे सेवन करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी