भिजवलेले शेंगदाणे खा मधुमेह नियंत्रणात ठेवा

Peanuts benefits in diabetes Soaked groundnut is effective in relieving diabetes : मधुमेह असलेल्या व्यक्तीने कोणताही पदार्थ खाण्याआधी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे याची खात्री करून घेणे हिताचे आहे.

Peanuts benefits in diabetes Soaked groundnut is effective in relieving diabetes
भिजवलेले शेंगदाणे खा मधुमेह नियंत्रणात ठेवा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भिजवलेले शेंगदाणे खा मधुमेह नियंत्रणात ठेवा
  • भिजवलेले शेंगदाणे, अक्रोड, भिजवलेले बदाम हे पदार्थ मर्यादीत प्रमाणात खावे
  • शरीराचे पुरेसे पोषण होईल

Peanuts benefits in diabetes Soaked groundnut is effective in relieving diabetes : मधुमेह असलेल्या व्यक्तीने कोणताही पदार्थ खाण्याआधी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे याची खात्री करून घेणे हिताचे आहे. ज्या पदार्थामुळे रक्तातील साखर एकदम वाढून तब्येतीला त्रास होण्याची शक्यता आहे असे पदार्थ खाऊ नये असे सांगतात. मधुमेहाचा त्रास असलेले तसेच एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त असलेले अनेकजण शेंगदाणे खाणे टाळतात. शेंगदाणे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात आणि वजन वाढविण्यास कारणीभूत ठरतात असे कारण यासाठी सांगितले जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. मर्यादीत प्रमाणात शेंगदाणे खाणे तब्येतीच्यादृष्टीने हिताचे आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

मधुमेह असलेल्या व्यक्तीने मर्यादीत प्रमाणात भिजवलेले शेंगदाणे खाणे हिताचे आहे. यामुळे शरीराचे पुरेसे पोषण होईल. भिजवलेले शेंगदाणे, अक्रोड, भिजवलेले बदाम हे पदार्थ मर्यादीत प्रमाणात खावे. अतिरेक टाळावा. यामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट, फायबर, प्रोटिन्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आदी पोषक घटकांचा लाभ होऊ शकतो.

मर्यादीत प्रमाणात भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राखण्यास मदत होते. हृदयक्रिया सुरळीत सुरू राहते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल आणि सूज अशा स्वरुपाच्या त्रासांनी त्रस्त नागरिकांना मर्यादीत प्रमाणात लाभ होतो. पण भिजवलेले शेंगदाणे, अक्रोड, भिजवलेले बदाम यांचा अतिरेक शरीरासाठी घातक ठरू शकतो. यामुळे वैद्यकीय सल्ल्याने स्वतःचा डाएट चार्ट तयार करणे त्याचे तंतोतंत पालन करणे हिताचे आहे. 

जास्त प्रमाणात शेंगदाणे, अक्रोड, बदाम खाल्ल्यास वजन वाढणे, कोलेस्टेरॉल या समस्या भेडसावू शकतात. पण भिजवलेले शेंगदाणे, अक्रोड, भिजवलेले बदाम वैद्यकीय सल्ला घेऊन मर्यादीत प्रमाणात खाल्ल्ल्यास मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राखण्यास तसेच हृदयक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : प्रस्तुत मजकूर हा संकलित आहे. या मजकुराची जबाबदारी टाइम्स नाउ मराठी घेत नाही. प्रस्तुत मजकुराच्या आधारे कोणतीही कृती करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी