कोरोनाचा अधिक धोका कोणाला, जाणून घ्या या खास रिपोर्टमधून

चीनमधील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या लोकांचा रक्तगट ए आहे त्यांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त असतो. 

people of a blood group are more threatened than coronavirus study reveals
'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका, संशोधनात खुलासा  |  फोटो सौजन्य: BCCL

बीजिंग (चीन): रक्तगट 'A' असलेल्या लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो तर 'O' रक्तगट असणाऱ्यांना प्राणघातक विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. एका नवीन संशोधनानुसार याचा खुलासा झाला आहे. दक्षिण चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP)च्या अहवालानुसार, प्राथमिक अभ्यासात चीनमध्ये त्या  रूग्णांचे रक्तगट तपासले गेले जे या आजाराला बळी पडले होते. त्यामध्ये याचा खुलासा झाला आहे. 

वुहान युनिव्हर्सिटीच्या झोंगनान हॉस्पिटलममध्ये सेंटर फॉर एविडेंस-बेस्ड एंड ट्रांसलेशनल मेडिसिन यांच्यासह वांग जिंगहुआन यांच्या नेतृत्वात संशोधकांनी वुहान आणि शेंजेनमधील २००० पेक्षा जास्त संक्रमित रूग्णांच्या रक्तगटांचे नमुने पाहिले. तेव्हा त्यांना असं आढळून आलं की, रक्तगट A मधील रुग्णांमध्ये अधिक संक्रमण होत आहे आणि त्यांच्यात अधिक गंभीर लक्षणे आढळून येत आहेत.

याउलट, o रक्तगटाच्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे आणि जरी त्यांना संसर्ग झाला  तरी, इतर रक्तगटांपेक्षा O रक्तगटाच्या रुग्णांचा हा आजार गंभीर अवस्थेत पोहचण्याची शक्यता कमी असते. 

A रक्तगट असलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक 

हे निष्कर्ष सर्व लिंग आणि वयोगटांना लागू आहेत. मात्र ही प्राथमिक तपासणी आहे. जेव्हा संशोधकांनी याबाबत अधिक अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळले की ज्या २०६ जणांचा मृत्यू   COVID-19 मुळे झाला त्यापैकी तब्बल ८५ जणांचा रक्तगट 'A' आहे. तर 'O' रक्तगट असणाऱ्या ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. 'O' रक्तगटापेक्षा 'A' रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा धोका जास्त आहे.

सर्वांना सावधगिरी बाळगण्याची गरज 

संशोधनात म्हटलं आहे की, "रक्तगट A मधील लोकांना संसर्ग होण्याची शक्यता कमी करयाची असल्या त्यांनी अधिक स्वच्छता पाळणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की, जर आपला रक्तगट O आहे म्हणून आपण पूर्णपणे सुरक्षित आहात. आपण देखील सर्व सुरक्षित मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणं गरजेचं आहे. 

यूएस नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या अभ्यासानुसार, 'O' हा भारतातील सर्वात सामान्य रक्त गट (३७.१२ टक्के) आहे. त्यानंतर B ३२.२६% आहे. त्यानंतर A २२.८८ टक्के आहे, तर AB ७.७४ टक्के सर्वात कमी असा रक्तगट आहे. अमेरिकेतील लोकसंख्येपैकी सुमारे ४४ टक्के लोकांचा रक्तगट हा O आहे.  तर जवळजवळ 41 टक्के लोकांचा रक्तगट A आहे.

डॉक्टरांचा असं म्हणणं आहे की, कोरोना व्हायरस महिलांमध्ये प्रवेश करण्याची आणि पसरण्याची क्षमता समान आहे. विविध आकडेवारीवरून असे दिसून येते की महिलांपेक्षा पुरुषांना या व्हायरसची अधिक लागण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...