Diet Plan: नोकरदार महिलांपासून ते अगदी गृहिणींपर्यंत सर्वांना आवश्यक असा परफेक्ट डाएट प्लान

तब्येत पाणी
Updated Apr 18, 2019 | 21:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिवसभराच्या धावपळीमुळं महिलांचं स्वतःच्या खाण्याकडे दुर्लक्ष होतं, मग ती महिला नोकरी करणारी असो अथवा गृहिणी. याचे दुष्परिणामही त्यांना सहन करावे लागतात. याचा त्यांच्या फिगरवर सर्वात आधी परिणाम होतो.

Perfect Diet plan for women
महिलांसाठी खास डाएट प्लान  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: लग्नाआधी तरूणींवर जास्त जबाबदारी नसते त्यामुळं त्या आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. योग्य डाएट फॉलो करतात. पण त्यांच्यावर जबाबदारी पडल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीनं सर्वात आधी काही बिघडतं तर ते रोजचं डाएट. डाएट व्यवस्थित नसेल तर ते वजन वाढण्यासाठी मोठं कारण बनतं. नोकरी करणाऱ्या महिला असो किंवा गृहिणी सर्व महिलांनी योग्य डाएट करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांचं पोट भरलेलं राहिल, वजन वाढणार नाही आणि त्या निरोगीही राहतील.

निरोगी डाएटचा अर्थ आहे योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेड आणि फॅट्सबरोबरच व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्स यांचा समतोल ठेवणं. यामध्ये कोणताही एक घटक कमी झाला तर आरोग्याचं व्यवस्थापन बिघडलंच समजा. खासकरून कार्बोहायड्रेड आणि फॅट्सचं प्रमाण अधिक होणं सर्वात जास्त नुकसान पोहोचवणारं आहे. खरंतर जास्त प्रोटीन खाणं लाभदायक असतं पण त्यातही फॅट्स कमीप्रमाणात असली पाहिजे. प्रोटीनच्या सेवनानं आपल्याला खूप वेळेपर्यंत पोट भरलेलं असल्याची जाणीव होते. त्यामुळं आपण नोकरी करणाऱ्या महिला असो वा गृहिणी आपल्याकडं वेळेची मर्यादा असेल तर आपण सकाळी कमीत कमी ‘प्रोटीन रिच डाएट’ घेणं आवश्यक आहे. तर मग आज आपण एक असा डाएट प्लॅन बघणार आहोत जो आपल्या आरोग्यासाठी एकदम योग्य असेल.

 

 

हा डाएट प्लॅन आपल्यासाठी एकदम योग्य असेल

  • सकाळचा ब्रेकफास्ट अर्थात न्याहारी

सकाळी ८ वाजेपर्यंत: दलिया / कॉर्न फ्लेक्स / ओट्स / साखर आणि दूधाबरोबर एक मध्यम वाटी म्युसली

मिड-मॉर्निंग १० वाजता: अंड / फ्रेंच टोस्ट, 1 अंड - एक टोस्ट

मिड-मॉर्निंग १२ वाजता:  दोन पालक किंवा मिक्स वेज पराठे / दोन व्हेजिटेबल मिक्स पॅनकेक, पालक-कॉर्न-चीज सँडविच एक पीस, दोन पीस बेसन चीला बरोबर फ्रूट चाट एक बाउल.

  • दुपारचे जेवण

दुपारी दिड वाजता: राजमा/ चणे/ सोयाबीन/ हिरवे वाटाणे भाजी १ वाटी, दोन मल्टीग्रेन चपाती, एक वाटी दही आणि एक वाटी ब्राउन राइस

इव्हनिंग स्नॅक्स: प्रोटीन मिल्कशेक २०० एमएल, भाजलेले चणे किंवा मिक्स नट्स एक मुठभर, थोड्या कुरमुऱ्यांबरोबर

  • रात्रीचं जेवण

संध्याकाळी ७ वाजेपर्यंत: चिकन / मटन / पनीर / डाळ एक वाटी, फूलकोबी आणि बटाट्याची भाजी / मौसमी भाजी १ वाटी, मल्टी ग्रेन पोळी दोन आणि दही किंवा ताक एक ग्लास.

सकाळी झोपून उठल्यानंतर दोन तासांच्या आत काही तरी खाणं आवश्यक आहे, स्वत:ला उपाशी ठेवू नका. हा डाएट प्लान फॉलो केल्यानंतर लवकरच आपल्याला फरक जाणवेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Diet Plan: नोकरदार महिलांपासून ते अगदी गृहिणींपर्यंत सर्वांना आवश्यक असा परफेक्ट डाएट प्लान Description: दिवसभराच्या धावपळीमुळं महिलांचं स्वतःच्या खाण्याकडे दुर्लक्ष होतं, मग ती महिला नोकरी करणारी असो अथवा गृहिणी. याचे दुष्परिणामही त्यांना सहन करावे लागतात. याचा त्यांच्या फिगरवर सर्वात आधी परिणाम होतो.
Loading...
Loading...
Loading...