पाळीदरम्यान होणारे शारिरीक बदल, जाणून घ्या सर्व काही...

तब्येत पाणी
Updated Oct 13, 2021 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

पीरियड्सला मासिक पाळी, महिना, मेन्स्ट्रुअल सायकल, एमसी अथवा रजोधर्म असे म्हटले जाते. महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळी येते. 

menstrual cycle
पाळीदरम्यान होणारे शारिरीक बदल, जाणून घ्या सर्व काही... 
थोडं पण कामाचं
  • अनेकजण म्हणतात की पाळीचे रक्त अशुद्ध असते.
  • पाळीदरम्यान काही महिलांच्या शरीरात बदल पाहायला मिळतात.
  • महिलांना पाळीदरम्यान गोड खाण्याची इच्छा होते. अशात त्यांनी डार्क चॉकलेटचे सेवन करावे.

मुंबई: नियमित पाळी येणे हे महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होते. महिला प्रजनन संस्थेत हे बदल होत असतात ज्यामुळे महिला गर्भवती होणे शक्य होते. हे चक्र गर्भावस्थेसाठी गर्भाशयाची तयारी आणि अंडाशयात अंड्यांना बनवण्याचे काम करतात. मासिक पाळी हा याच चक्राचा एक भाग असतो. महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदलामुळे योनितून रक्तस्त्राव होतो. यालाच मासिक पाळी म्हणतात. 

मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक सामान्य प्रक्रिया आहे. हे केवळ प्रजननासाठीच योग्य नव्हे तर आरोग्याबाबतही सांगते. सगळ्यांना एकाच वयात मासिक पाळी येत नाही. काहींना १२ ते १३ व्या वर्षांपासून सुरूवात होते तर काहींना १० ते १३ या वर्षादरम्यान पाळी येते. महिन्यातून एकदा पाळी येते. हे चक्र सामान्यपणे २८ ते ३५ दिवसांचे चक्र असते. जेव्हा महिला गर्भवती नसते तेव्हा ही प्रक्रिया दर महिन्याला येते. म्हणजेच २८ ते ३५ दिवसांच्या मध्ये नियमितपणे पाळी असते. जाणून घ्या या पाळीबद्दल अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक महिलेला जाणून घेणे गरजेचे आहे. 

पाळीचे रक्त अशुद्ध असते

अनेकजण म्हणतात की पाळीचे रक्त अशुद्ध असते. हे रक्त म्हणजे गर्भाशयाचे जुन्या पेशी, योनी तसेच सर्विक्सचा स्त्राव आणि रक्ताचे हे मिश्रण असते. सामान्य रक्तापेक्षा हे थोडे वेगळे असते मात्र याचा अर्थ असा नाही की हे रक्त घाणेरडे अथवा अशुद्ध असते. 

पाळीदरम्यान गर्भवती न राहणे

हे पूर्णपणे सत्य नाही. सेक्सदरम्या जर स्पर्म व्हजायनाच्या आत राहिले तर ते सात दिवसांपर्यंत जिवंत राहतात. म्हणजेच पुढील सात दिवसांपर्यंत प्रेग्नंसीचे चान्सेस असतात. यासाठी पाळीदरम्यान कंडोमचा वापर केला पाहिजे. 

पाळीदरम्यान शरीरात बदल

पाळीदरम्यान काही महिलांच्या शरीरात बदल पाहायला मिळतात.ज्यामुळे त्याच्या लूकमध्ये फरक दिसतो जसे या दरम्यान पोटात सूज दिसते कारण यादरम्यान पोटाचा आकार त्रिकोणासारखा होतो. तसेच ब्रेस्टचाही आकार या दिवसांमध्ये वाढतो.

पाळीदरम्यान गोड खाण्याची इच्छा

महिलांना पाळीदरम्यान गोड खाण्याची इच्छा होते. अशात त्यांनी डार्क चॉकलेटचे सेवन करावे. ययातील अँटी ऑक्सिडंट सेरोटोनिन वाढवते यामुळे मूड चांगला होतो. पाळीदरम्यान डार्क चॉकलेट खाल्ल्याने फायदा होतो. 

व्हिटामिन्स आणि आर्यनचा समावेश

पाळीदरम्यान व्हिटामिन एयुक्त हिरव्या पालेभाज्यांचा डाएटमध्ये समावेश जरूर करावा. यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. याशिवाय व्हिटामिन बी६ने भरपूर असलेल्या बटाट्याचे सेवन केल्याने रक्ताच्या गुठळ्या कमी होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी