Interesting facts: हे फळ पिकायला लागते 2 वर्ष, काही लोकं खाण्यास घाबरतात!

तब्येत पाणी
Updated Apr 10, 2023 | 05:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pineapple : या फळातील एक विशेष एनजाईम घटक जिभेवर पसरत जिभेच्या मांसल भागावर अल्कधर्मी तत्व सोडतो. ज्यामुळे जीभ फडफडणे किंवा झिंजिण्या येणे असे प्रकार जाणवतात. त्यामुळे अनेक लोकं हे फळ खाण्यास घाबरतात.

benefits of pineapple
असे करा अननसाचे सेवन  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • फलाहार खूप फायदेशीर आहे.
  • अननस पिकायला अडीज ते दोन वर्ष लागते
  • काही लोकं अननस खाण्यास का घाबरतात?

Interesting facts: फलाहार खूप फायदेशीर आहे. फळे आपल्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करून आपल्याला निरोगी ठेवतात. प्रत्येक फळांमध्ये विविध प्रकारचे गुण तत्व असतात. त्यानुसार फळांच्या पोषणाची पद्धतही वेगवेगळी असते. काहींना वाढण्यासाठी थंड वातावरणाची गरज असते, तर काहींना उबदार वातावरणाची आवश्यकता असते. काही फळे आठवड्यातच बनून तयार होतात, तर काही फळे पिकायला बरीच वर्षे लागतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका फळाबद्दल सांगणार आहोत, जे पिकण्‍यासाठी 3 वर्षे लागतात. काही लोकांना हे फळ खूप आवडते, तर काहींना ते खायला भीती वाटते. (pineapple takes 2 years to ripen some people are afraid to eat)

अधिक वाचा - ​टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

फळ पिकायला अडीज ते दोन वर्ष लागते

आपण ज्या फळाबद्दल बोलत आहोत ते फळ आहे अननस! अननस पिकण्यास सुमारे 18-24 महीने लागतात. हे फळ तयार होण्याचा कालावधी त्या क्षेत्राचे हवामान आणि सुपीक जमिनीवर अवलंबून असते. 

अननसाची लागवड कुठे होते?

अननस हे प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील उच्च तापमान असलेल्या भागात घेतले जाते. विशेषतः ब्राझील, कोलंबिया, थायलंड, फिजी, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, फिलीपिन्स, चीन आणि हवाई या देशांमध्ये अननसाची लागवड केली जाते.    

अधिक वाचा -    ​टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

भारतात सर्वात जास्त लागवड कुठे केली जाते?

भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये अननसाची लागवड केली जाते. विशेषत: पश्चिम बंगाल आणि केरळ ही दोन राज्ये आहेत जी भारतातील अननस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. 

अननसामध्ये अनेक प्रकारचे पोषक गुणधर्म असतात

अननस अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, फायबर आणि ब्रोमेलेन यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. अननसात इतरही अनेक पोषक तत्व आहेत,  जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. अननसाचे अनेक फायदे असूनही काही लोक अननसाचे सेवन करण्यास घाबरतात.

अधिक वाचा - ​उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने होतील या समस्या

काही लोकं अननस खाण्यास का घाबरतात?

अननसा खालल्यानंतर जिभेला एक विचित्र प्रकारच्या मुंग्या येऊ लागतात. अननसामध्ये असणाऱ्या ब्रोमेलेन नामक एन्झाइममुळे जिभेला मुंग्या येतात. हे एंझाइम जिभेवर पसरते आणि जिभेच्या मांसामध्ये अल्कधर्मी घटक सोडते, ज्यामुळे जीभ थोडी अस्थिर होते. ज्यामुळे जीभ फडफडणे  किंवा झिंजिण्या येणे असे प्रकार जाणवतात. 

या एन्झाईममुळे काहींना अननस खाल्ल्यानंतर जीभेला खाज सुटणे किंवा जळजळ जाणवू शकते. परंतु ही समस्या बहुतेक लोकांना होत नाही आणि काही काळानंतर ती स्वतःच बरी होते. झिंजिण्या थांबत नसेल किंवा जळजळ सहन होत नसेल, तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

असे करा अननसाचे सेवन

काही आहारतज्ज्ञांच्या मते अननस खाण्यापूर्वी ते कापून मीठ आणि पाण्यात भिजवावे. असे केल्याने ब्रोमेलेन एंझाइम निष्क्रिय होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी