मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकवरील(plastic) बंदीबाबत विचार सुरू आहे.मात्र अद्याप पूर्ण प्लास्टिकबंदी(ban on plastic) घालण्यात आलेली नाही. रोजच्या आयुष्यात आपण पावलोपावली प्लास्टिकचा वापर करत असतो. दररोजच्या वापराच्या गोष्टींमध्ये प्लास्टिक असते. प्लास्टिक सुरूवातीपासून निसर्गास हानिकारक राहिले आहे. त्याचा आरोग्यावरही वाईट परिणामच होतो. प्लास्टिकपासून अनेक दुष्परिणाम होतात हे साऱ्यांनाच माहीत आहे मात्र याचा लठ्ठपणाशीही संबंध आहे बरं का...
अधिक वाचा - 'महाजेनको' 8 हजार मेगावॅट वीज निर्मिती करणार
सध्याच्या काळात लठ्ठपणा ही मोठी समस्या बनली आहे. जगभरात मोठ्या संख्येने लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. लठ्ठपणाची कारणे अनेक आहेत. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की प्लास्टिकमुळे लठ्ठपणास निमंत्रण मिळाले आहे. प्लास्टिकमधील केमिकल्समुळे वजन वाढते.
अधिक वाचा - रिझर्व्हेशन असूनही नाही मिळाली सीट, रेल्वेला १ लाखाचा दंड