सकाळी नाश्ताला पोहे खाल्ल्याने होतात हे फायदे

तब्येत पाणी
Updated Jul 08, 2018 | 19:50 IST | पूजा विचारे

पोहे हा असा एक नाश्ता आहे की,  संपूर्ण भारतात मोठ्या चवीने खाल्ला जातो. पोहे सकाळी ब्रेकफास्टला खाल्ल्यास दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते. पोह्यात जास्त प्रमाणात लोह असते. गर्भवती महिला आणि लहान मुलांनी पोहे जरूर खाल्ले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढते. 

poha
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : सकाळचा नाश्ता सर्वांत महत्त्वपूर्ण मानला जातो. ज्यात पोहे असा एक नाश्ता आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या चवीने खाल्ला जाते. जे लोक डायटिंग करत असतील त्यांना सकाळी नाश्तामध्ये पोहे खूप फायदेशीर ठरतात. पोहे खाल्ल्याने कधी पोट बाहेर येत नाही. पोह्यामधून खूपसारे व्हिटामिन, मिनरल आणि एन्टीऑक्सिडेंट ही मिळते. 

पोहे बनवण्याची प्रत्येकाची रेसिपी जवळपास वेगवेगळी असते. तुम्हांला हव्या असल्यास तुम्ही पोह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या टाकू शकता. त्यामुळे पोहे हेल्दी आणि टेस्टी होतात. पोह्याला नाश्तामध्ये खाल्ल्यास रक्तपुरवठाही अगदी योग्य आहे. पोह्यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि मधुमेह देखील दूर होतो. 

नाश्तामध्ये पोह्याचे सेवन केल्याने तुमचे पूर्ण आरोग्य ठिक राहते. चला तर मग जाणून घ्या पोहा कोणत्या प्रकाराने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो

मोठा प्रमाणात एनर्जी प्राप्त होते

तुमचा ब्रेकफास्ट हेल्दी असला पाहिजे. त्यासाठी पोहे एक बेस्ट ऑप्शन आहे. पोहे ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यास तुम्हांला दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते. एवढंच नाही तर तुम्ही दुपारच्या जेवणात देखील पोहे खाऊ शकता. 

लोह

तुमच्या शरीरात जर का लोह्याची कमतरता असेल तर पोहे जरूर खा. पोहे खाल्याने लोहाची कमतरता दूर होते. पोह्यात मोठ्या प्रमाणात लोह असते. गर्भवती महिला आणि लहान मुलांनी पोहे आवर्जून खावे. ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. 

योग्य प्रमाणात हेल्दी कार्बोहायड्रेट्स

सकाळी नाश्तामध्ये शरीराला कार्बोहायड्रेट्स देण्यासाठी पोहे खावे. जर शरीरात गरजेनुसार कार्बोहायड्रेट्स मिळाले नाही तर थकवा जाणवतो. कार्बोहायड्रेट्समुळे शरीरात एनर्जी येते. त्यामुळे सकाळी एक प्लेट पोहे जरूर खा. 

मधुमेह रुग्णांसाठी चांगले

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी पोहे खाणे खूप फायदेशीर ठरते. हे खाल्ल्यास पोट खूप वेळासाठी भरलेले राहते. पोह्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतं. 

लठ्ठपणा कमी करण्यास मदत

पोहे खाल्ल्याने वजन वाढत नाही. तर एक वाटी पोह्यात कमीत कमी २५० कॅलेरीज असते. त्यासोबतच व्हिटामिन, मिनरल आणि एंन्टीऑक्सिडेंट देखील असते. जर का तुम्ही डायटवर असाल तर पोह्यात शेंगदाणे टाकू नये नाहीतर कॅलेरीजमध्ये वाढ होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी