Exercise for Hair Growth: केसांची वाढीसाठी आजपासून करा या योगासनांचा सराव

तब्येत पाणी
Updated Mar 28, 2023 | 20:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

घरगुती उपचारांपासून ते वैद्यकीय उपचारांपर्यंत सगळे पर्याय वापरून देखील अपेक्षित परिणाम न दिसल्याने त्यांची निराशा होते. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की योगामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. योगाच्या मदतीने तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

Practice these yogasanas for hair growth from today
Exercise for Hair Growth: केसांची वाढीसाठी आजपासून करा या योगासनांचा सराव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केसांसाठी हा योग करा
  • योगासनांच्या मदतीने केस गळणे थांबते
  • केस तुटणे आणि गळणे यासाठी विविध उपचार

Hair Growth Exercise: प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिचे केस लांब आणि दाट असावेत. मात्र बदलत्या ऋतूमुळे अनेक महिला केस गळण्याच्या समस्येने हैराण झाल्या आहेत. बदलत्या ऋतूनुसार केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे. बदलत्या हवामानामुळे केस निर्जीव होऊन तुटायला लागतात. केस गळतीचा त्रास असलेल्या महिला केसगळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शॅम्पू आणि रासायनिक उत्पादने वापरतात. केस तुटणे आणि गळणे यासाठी लोक विविध उपचार करतात. (Practice these yogasanas for hair growth from today)

घरगुती उपचारांपासून ते वैद्यकीय उपचारांपर्यंत सगळे पर्याय वापरून देखील अपेक्षित परिणाम न दिसल्याने त्यांची निराशा होते. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की योगामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. योगाच्या मदतीने तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. म्हणून आज जाणून घ्या कोणत्या योगासनांच्या मदतीने तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

केसांसाठी हा योग करा

अधिक वाचा: Turmeric for skin care: चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी टर्मरिक फेस क्लींजर वापरून पहा

वज्रासन
वज्रासनामुळे केस मजबूत होतातच पण केस पांढरे आणि केसगळण्याच्या समस्येपासून सुटका मिळण्यास मदत होते.

उष्ट्रासन 
केसांसाठी उष्ट्रासन हा सर्वोत्तम योग आहे. या योगासनाच्या मदतीने तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यासोबतच या योगाच्या मदतीने केस पांढरे होणे देखील कमी होते.

अधिक वाचा: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे चांगले आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे

पवनमुक्तासन
केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी पवनमुक्तासन हे अतिशय प्रभावी योगासन आहे. हे योग आसन केसांच्या वाढीसाठी देखील मदत करते.

अधोमुख श्वान आसन
या योगासनाने रक्ताभिसरण सुधारते. हा योग केल्याने केसांची वाढ चांगली होते आणि केस गळणेही कमी होते.

अधिक वाचा: Milk Benefits: दूध कच्चं प्यावं की उकळून? जाणून घ्या काय सांगतो विज्ञानाचा नवा फॉर्मुला

केसांच्या वाढीसाठी बोटांचा व्यायाम
दोन्ही हातांची नखे एकत्र एकमेकांवर घासल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. या योगासनाच्या मदतीने केस पांढरे होत नाही.

टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी