Pre Diabetic Symptoms: मधुमेह होण्यापूर्वी दिसतात ‘ही’ लक्षणं, वेळीच व्हा सावधान

घाम येणे आणि चक्कर येणे, ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे मानली जातात. रक्तात साखरेचं प्रमाण वाढू लागल्यानंतर शरीराचं अंतर्गत तापमान असंतुलीत व्हायला सुरुवात होते. तापमान नियंत्रित ठेवण्याची शरीराची क्षमता मधुमेहामुळे कमी होते.

Pre Diabetic Symptoms
मधुमेह होण्यापूर्वी दिसतात ‘ही’ लक्षणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मधुमेह होण्यापूर्वी दिसतात अनेक लक्षणं
  • अचानक घाम येतो आणि येऊ शकते चक्कर
  • लक्षणं ओळखली तर टाळता येईल भविष्यातील धोका

Pre Diabetic Symptoms: गेल्या काही वर्षांत भारतात मधुमेहाच्या रुग्णांची (Diabetic patients) संख्या वाढत चालली आहे. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, वाढते ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असते. रक्तातील साखरेची पातळी (Sugar level) वाढणे आणि मधुमेहाच्या दिशेने प्रवास होणे, हा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडत असतो. मात्र साखरेची पातळी वाढत असल्याचं अनेकांच्या लक्षात येत नाही. त्रास होऊ लागल्यानंतर तपासणी केली असता, अचानक आपल्याला मधुमेह झाल्याचं अनेकांना लक्षात येतं आणि धक्का बसतो. मात्र आपण आपल्या शरीराकडून येणाऱ्या संकेतांवर बारीक लक्ष ठेवलं, तर आपल्याला मधुमेह होऊ लागल्याची काही लक्षणं दिसतात. ही लक्षणं वेळीच ओळखली आणि त्यावर उपाय केले, तर रक्तातील साखरेची वाढ वेळीच रोखता येऊ शकते.

मधुमेहापूर्वी दिसतात ही लक्षणे

घाम येणे आणि चक्कर येणे, ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे मानली जातात. रक्तात साखरेचं प्रमाण वाढू लागल्यानंतर शरीराचं अंतर्गत तापमान असंतुलीत व्हायला सुरुवात होते. तापमान नियंत्रित ठेवण्याची शरीराची क्षमता मधुमेहामुळे कमी होते. त्यामुळे प्रमाणापेक्षा खूप जास्त घाम येणे किंवा घामाचं प्रमाण अगदीच कमी होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. पायांना अधिकाधिक घाम येणे, चक्कर येणे, मुंग्या येणे हीदेखील मधुमेहाची पूर्वसूचना देणारी काही लक्षणे असतात. 

अधिक वाचा - Loose weight for marriage: लग्नसराईत दिसा सडपातळ आणि फिट, ‘या’ उपायांनी वजन करा पटापट कमी

प्री-डायबेटिक म्हणजे काय?

जेव्हा रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढू लागतं, मात्र मधुमेहाच्या पातळीपर्यंत ते पोहोचलेलं नसतं, त्या अवस्थेला प्री-डायबेटिक असं म्हटलं जातं. या अवस्थेत शरीरात अनेक बदल होत असतात, जे साहजिक मानले जातात. या लक्षणांमध्ये विशेष असं काहीच नसतं. त्यामुळेच अनेकांना सहजासहजी ही लक्षणं जाणवत नाहीत. 

काय असतात कारणं?

प्री-डायबेटिक असण्यामागे अनेक कारणं असतात. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कामाच्या उलटसुलट वेळा, पुरेशी झोप न घेणे, कुठल्या ना कुठल्या तणावाखाली असणे, व्यसनाधीनता, व्यायामाचा अभाव या आणि अशा कुठल्याही कारणाने व्यक्ती ‘प्री-डायबेटिक’ अवस्थेत पोहोचण्याची शक्यता असते. प्री-डायबेटिक अवस्थेत पोहोचल्यानंतर उलटी, मळमळ, उच्च रक्तदाब, घाम येणे, पाय बधीर होणे यापैकी कुठलीही लक्षणं दिसू शकतात. या अवस्थेत वजन नियंत्रणात ठेवणं अत्यावश्यक असतं. वजन वाढल्यामुळे आरोग्याशी संबंधित गंभीर विकार जडण्याची शक्यता असते. कॅन्सर, उच्च रक्तदाब, हृदयरोग, हार्ट स्ट्रोक यासारख्या समस्या त्यामुळे उद्भवू शकतात. 

अधिक वाचा - Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी, केवळ असे करा सेवन

करा हे उपाय

जर पुरुषांच्या कंबरेचा आकार 40 पेक्षा जास्त असेल आणि महिलांच्या कंबरेचा आकार 35 पेक्षा जास्त असेल, तर हे प्री-डायबेेटिक असण्याचं लक्षण मानलं जातं. ही लक्षणं कमी करण्यासाठी दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हाय फायबर डाएट करणे, कॅलरीयुक्त पदार्थ कमी करणे, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी