Fasting Tips for Pregnant Women : गरोदरपणात ठेवतांय हरतालिकेचे व्रत, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Health Tips : हरतालिका तीज भारतात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. यंदा तीज ३० ऑगस्टला साजरी होणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत (Hartalika Fasting) ठेवण्यासोबतच पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात. यालाच हरतालिकेचे (Hartalika 2022) व्रत असेदेखील म्हणतात. हे व्रत करवा चौथपेक्षा कठीण मानले जाते. अशा परिस्थितीत जर गर्भवती महिलेने ( Pregnant Women)उपवास करताना अधिक खबरदारी घेतली पाहिजे.

Hartalika 2022
हरतालिका व्रत 
थोडं पण कामाचं
  • हरतालिका तीज ३० ऑगस्टला साजरी होणार आहे.
  • या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत (Hartalika Fasting) ठेवण्यासोबतच पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात.
  • गर्भवती महिलेने ( Pregnant Women)उपवास करतानाच्या काही टिप्स

Hartalika 2022 Fasting Tips for Pregnant Women:नवी दिल्ली : हरतालिका तीज भारतात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. यंदा तीज ३० ऑगस्टला साजरी होणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत (Hartalika Fasting) ठेवण्यासोबतच पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात. यालाच हरतालिकेचे (Hartalika 2022) व्रत असेदेखील म्हणतात. हे व्रत करवा चौथपेक्षा कठीण मानले जाते. अशा परिस्थितीत जर गर्भवती महिलेने ( Pregnant Women)उपवास करताना अधिक खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिप्स आहेत ज्या गर्भवती महिलांनी फॉलो करू शकतात. (Precautions to be taken by Pregnant Women on Hartalika Teej)

अधिक वाचा : Hartalika 2022 Aarti: हरितालिकेच्या दिवशी करा 'ही' आरती, माता पार्वती होईल प्रसन्न

अशा प्रकारे ठेवता येते गरोदरपणात हरतालिका तीजचे व्रत -

मान्यतेनुसार महिलांना हरतालिका तीजला 'निर्जल' व्रत करावे लागते. मात्र अनेक गरोदर महिलांनाही हे व्रत पाळायचे असते. त्यामुळे त्यांना 'निर्जल' व्रत न पाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्याचा आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत निर्जला व्रताऐवजी फळांसह उपवास ठेवता येईल. ज्यामध्ये तुम्ही अन्नधान्य खात नाही पण फळे, पाणी नियमित घेऊ शकता.

अधिक वाचा : Hartalika 2022: लग्नात येताहेत अडथळे?, जोडीदारासोबत Breakup?; हरितालिका व्रताच्या दिवशी करा 'हे' उपाय; सर्व अडचणी होतील दूर

उपवास करताना लक्षात ठेवा हे मुद्दे -

1. शरीरातील पाण्याचे प्रमाण राखा- हरतालिका तीजला जरी स्त्रिया 'निर्जल' व्रत करत असल्या तरी ते गरोदर महिलांसाठी योग्य नाही. त्यामुळे जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही शरीरात योग्य पाण्याचे प्रमाण राखावे. योग्य तितके पाणी प्यावे. दिवसभर ज्यूस आणि पाणी यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करत राहा.

2 चहा-कॉफी टाळा- अनेकदा लोक उपवासात चहा-कॉफी पितात, पण ते पूर्णपणे टाळावे. यामुळे पोटात जळजळ किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही नारळ पाणी, दही किंवा दूध पिऊ शकता.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022: मस्तकहीन गणेशाची केली जाते पूजा, केदारनाथजवळ आहे हे रहस्यमय बाप्पाचे मंदिर

3. फळे खाणे- गरोदरपणात जास्त वेळ पोट रिकामे राहू नये. त्यामुळे रिकाम्या पोटी राहू नका आणि अशी फळे खा ज्याने तुमचे पोट भरलेले राहते आणि तुमच्या शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखले जाते.

4. उपाशी राहू नका- उपवास करताना हे लक्षात ठेवा की तुमच्या पोटातील बाळ फक्त तुमच्या आहारावर अवलंबून आहे. त्यामुळे उपवासात अन्न पूर्णपणे वगळू नका. अशावेळी तुम्ही अधूनमधून थोडेसे खाऊ शकता.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका व्रत पाळले जाते. हरितालिका व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर दुसरीकडे अविवाहित मुलीही चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात. या उपवासात अन्न आणि पाणी घेतले जात नाही. असे मानले जाते की, हरितालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करून व्रत ठेवल्यास प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होते. शिवपुराणानुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी ठेवले होते. देवी पार्वतीच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारले.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी