Pregnancy Diet : गर्भातील बाळाचं वजन वाढत नसेल तर हे ५ सुपरफुड्स खा

प्रत्येक आईला (mother) आपलं मुलं सुदढ जन्माला यावं असं वाटतं. प्रसूती (Maternity) झाल्यानंतर प्रत्येकजण बाळाची तब्येत (health)आणि त्याचं वजन याबाबत विचारत असतं. कारणही अगदी तसंच आहे. बाळाचं उत्तम वजन त्याच्या पुढील निरोगी (Healthy) आयुष्यासाठी महत्वाचं असतं. बाळाला पोषक तत्त्वे मिळणे आवश्यक असते.

Pregnancy Diet
गर्भातील बाळाचं वजन वाढत नसेल तर हे ५ सुपरफुड्स खा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गर्भात वाढणाऱ्या बाळाचे वजन सामान्यपेक्षा कमी आहे असे तुम्हालाही वाटत असेल, तर तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या ५ सुपरफूडचा ताबडतोब तुमच्या आहारात समावेश करा.
  • बाळाला पोषक तत्त्वे मिळणे आवश्यक असते. तसेच बाळाचा विकासाबरोबर होणे गरजेचं असते.
  • पिवळ्या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये तुम्हाला अ जीवनसत्व मिळेल.

नवी दिल्ली : प्रत्येक आईला (mother) आपलं मुलं सुदढ जन्माला यावं असं वाटतं. प्रसूती (Maternity) झाल्यानंतर प्रत्येकजण बाळाची तब्येत (health)आणि त्याचं वजन याबाबत विचारत असतं. कारणही अगदी तसंच आहे. बाळाचं उत्तम वजन त्याच्या पुढील निरोगी (Healthy) आयुष्यासाठी महत्वाचं असतं. बाळाला पोषक तत्त्वे मिळणे आवश्यक असते. तसेच बाळाचा विकासाबरोबर होणे गरजेचं असते. त्यामुळे बाळ अशक्त होऊ, नये म्हणून मातेने गर्भधारणेच्या वेळीच योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे वजन सामान्यपेक्षा कमी आहे असे तुम्हालाही वाटत असेल, तर तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या ५ सुपरफूडचा ताबडतोब तुमच्या आहारात समावेश करा. 

डेअरी प्रोडक्ट्स

गर्भधारणेदरम्यान स्त्रीने भरपूर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. कारण त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि इतर पोषक तत्वही भरपूर असतात. जे बाळाचे वजन वाढवण्यास मदत करतात. जर तुमच्या बाळाचे वजन सामान्यपेक्षा कमी असेल, तर तिसऱ्या तिमाहीपासून दिवसातून ३ ग्लास दूध पिण्यास सुरुवात करा. यासोबतच रोज एक वाटी दही सेवन करा. 

अंडी

गर्भात वाढणाऱ्या बाळाचे वजन कमी असेल तर तुमचे डॉक्टरही अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंड्यांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने आढळतात. जी गर्भधारणेदरम्यान घेणे अत्यंत आवश्यक आहे. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाची प्रत्येक पेशी प्रोटीनपासून बनलेली असते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलेने अंडी खाल्ल्यास गर्भाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. याच्या सेवनाने बालकातील मानसिक आजारांचा धोका कमी होतो आणि त्याच्या मेंदूचा विकासही होतो. 

सुखा मेवा

गर्भवती महिलांना पहिल्यापासूनच पाण्यात भिजवलेले सुखा मेवा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्याचे कारण असे आहे की, ते मुलाच्या वाढीसाठी चांगले आहे. प्रथिने आणि जीवनसत्त्वे सोबतच, त्यात जस्त, तांबे, फॉलिक ऍसिड आणि अनेक मायक्रोमिनरल असतात. तुम्ही बदाम, जर्दाळू, शेंगदाणे, अंजीर, अक्रोड आणि इतर ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. तसेच डॉक्टर सुखा मेवा मोठ्या प्रमाणात न खाण्याचा देखील सल्ला दिला जातो. 

Read Also : 'एसी लोकल'चा प्रवास होणार 'कूल', तिकिटांच्या दरात मोठी कपात

​पालेभाज्या

गरोदरपणात आहार ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. गर्भाचे वजन वाढवायचे असेल तर ताज्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. पालक, मेथी, चवळी, हिरवा माढ यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि के, कॅल्शियम सारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि बाळामध्ये रक्ताभिसरणही चांगले होते. 

Read Also : Akshay Tritiya 2022: अक्षय्य तृतीया इतकी खास का आहे?

व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए अन्नपदार्थ

तुम्ही तुमच्या गरोदरपणात व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए जरूर घ्या. याचे सेवन केल्याने न जन्मलेल्या मुलाचे वजन चांगले होते. तसेच त्याची त्वचा, केस, दृष्टी आणि विशेषत: प्रतिकारशक्ती सुधारते. पिवळ्या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये तुम्हाला अ जीवनसत्व मिळेल. जर आपण व्हिटॅमिन-सी बद्दल बोललो, तर तुम्हाला ते संत्रा, किवी, पेरू, स्ट्रॉबेरी, आवळा, लिंबू इत्यादींमध्ये मिळेल. रोजच्या आहारात या फळांचा समावेश करावा.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी