सावधान! गरोदरपणात कोल्ड ड्रिंक पिणं टाळा, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

तब्येत पाणी
Updated Jun 25, 2019 | 13:48 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

गरोदरपणात प्रत्येक स्त्रिला आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. आपली अगदी लहान चूकही खूप मोठं नुकसान करू शकते. काही पदार्थ आणि पेय गर्भवती असतांना टाळलेलेच बरे... जाणून घ्या त्याबद्दल...

Soft Drink
सावधान! गरोदरपणात कोल्ड ड्रिंक पिणं टाळा (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: गरोदरपणामध्ये अनेकदा काही पदार्थ खाल्ल्यानं क्रेविंग होतं. एखादेवेळेस थोडं क्रेविंग झालं तर काही नाही तर पण क्रेविंग होणं गर्भवती स्त्रिच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याकडे गर्भवती महिलांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. काही पदार्थ असे आहेत जे खाल्ल्यानं क्रेविंग झालं तर ते गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठी खूप नुकसानदायक ठरू शकतं. असंच नुकसान करणारं क्रेविंग गरोदर महिलेनं सॉफ्ट ड्रिंक पिल्यानं होऊ शकतं.

कोल्ड ड्रिंक पिल्यानं झालेल्या क्रेविंगमुळे गर्भवती महिलेचं मिसकॅरेजसुद्धा होऊ शकतं. गरोदर असतांना अनेकदा महिलांची शुगर, बीपी, थॉयरॉईड वाढतं. त्यावर डॉक्टर उपाय करतात. पण जर गरोदर महिलेनं दररोज सॉफ्ट ड्रिंक पिलं तर उदरातील बाळाचं बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स खूप जास्त वाढतो. कोल्ड ड्रिंक फक्त आईसाठीच नाही तर पोटातील बाळावरही वाईट परिणाम करतं. जाणून घ्या सॉफ्ट ड्रिंकनं काय होतात गर्भवती महिलांवर दुष्परिणाम...

'हे' पदार्थ नुकसानदायक

कुठलाही पदार्थ ज्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर आणि प्रिजर्वेटिव्ह टाकलेलं असेल तर ते गरोदर महिलेसाठी चांगलं नसतं. जेव्हा या पदार्थात कार्बनडायऑक्साईड मिळतो तेव्हा तर तो पदार्थ गर्भवती महिलेसाठी अधिकच धोकादायक ठरतो. कोल्ड ड्रिंकमध्ये हे सर्व असतं. त्यामुळे आईपेक्षा जास्त वाईट परिणाम याचा उदरातील बाळावर होतो. कारण यात कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याची न्यूट्रीशनल व्हॅल्यू शून्य असते.

कॅफिनमुळे होतं खूप नुकसान

गरोदर असतांना कॅफिनपासून आपला बचाव करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला चहा आणि कॉफी प्यायची सवय आहे. तर दररोज २०० मिलीग्राम पेक्षा जास्त कॅफिनचा वापर करू नका. कोल्ड ड्रिंकमध्ये तर ५०० एमएलमध्ये ४२.३ एमएल कॅफिनचं असतं, तर २०३ कॅलरीज असतात. अशात जर गर्भवती महिला रोज कोल्ड ड्रिंक पित असेल तर ते तिच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.

बाळाचं ब्लड सर्कुलेशन कमी होतं

फक्त कोल्ड ड्रिंकच नाही तर कॉफी सुद्धा जास्त प्रमाणात घेतल्यास गरोदरपणात ती आईपेक्षा बाळाला जास्त धोकादायक ठरते. कॅफिनचं प्रमाण वाढलं तर नाळेद्वारे ते बाळापर्यंत पोहोचतं आणि बाळाचं ब्लड सर्कुलेशन यामुळे स्लो होतं. यातून मिसकॅरेज होऊ शकतं.

लघवीद्वारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरीरातून निघून जातात

शरीरात कॅफीनचं प्रमाण वाढलं तर लघवीचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे शरीरासाठी आवश्यक असलेले मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स लघवीद्वारे शरीरातून निघून जातात.

झोप लागत नाही

शरीरारातील कॅफिनचं प्रमाण वाढलं तर झोप लागत नाही. मात्र गरोदरपणात पूर्ण झोप घेणं महिलांसाठी आवश्यक असतं. चांगली झोप आई आणि बाळाच्या उत्तम विकासासाठी आवश्यक असते.

कॅफिन सोडून हे पदार्थ गर्भवती महिलांनी पिणं गरजेचं

जेव्हा आपल्याला चहा, कॉफीची सवय असते. ती सुटत नाही. तेव्हा कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा शरीरासाठी आवश्यक असलेले पेय प्यावेत. जसं लिंबू-पाणी, कैरीचं पन्हं, ताक, दही, लस्सी आणि नारळ पाणी पिणं गरोदर महिलांसाठी आवश्यक आहे.

नोट: वरील लेखामध्ये दिलेली माहिती ही टिप्स आणि सल्ला समजावा. त्याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सावधान! गरोदरपणात कोल्ड ड्रिंक पिणं टाळा, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान Description: गरोदरपणात प्रत्येक स्त्रिला आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. आपली अगदी लहान चूकही खूप मोठं नुकसान करू शकते. काही पदार्थ आणि पेय गर्भवती असतांना टाळलेलेच बरे... जाणून घ्या त्याबद्दल...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola