वजन कमी करा, घर बसल्या ते ही अॅक्युप्रेशर पद्धतीने !

अॅक्युप्रेशर पद्धतीचा ट्रेंड सध्या सुरू आहे, या पध्दतीने कोणत्याही औषधं गोळ्यांशिवाय तुम्ही अनेक आजारांचे निदान करू शकता, अगदी वजन सुद्धा कमी करू शकता.

press these four acupressure points daily to lose your weight
वजन कमी करा, घर बसल्या ते ही अॅक्युप्रेशर पद्धतीने !  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • अॅक्युप्रेशर चिकित्सा पद्धती ही प्राचीन काळापासून चालत आलेली पद्धती आहे.
  • कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही हे करू शकता.
  • कोणताही व्यायाम न करता वजन कमी करू शकता.

मुंबई : अॅक्युप्रेशर पद्धतीचा ट्रेंड सध्या सुरू आहे. या पद्धतीने कोणत्याही औषधं गोळ्यांशिवाय तुम्ही अनेक आजारांचे निदान करू शकता. अगदी वजन सुद्धा कमी करू शकता. अॅक्युप्रेशर पद्धती ही मुख्यत्वे करून चिनी पद्धती आहे. चीनमध्ये पूर्वपार चालत आलेली ही पद्धत आहे. चीनमध्ये आजही या पद्धतीचा वापर केला  जातो. या चिकित्सा पद्धतीमध्ये शरिरावरील काही प्रेशर पॉइंट्सना बोटांच्या सहाय्याने दाब दिला जातो. अॅक्युप्रेशर पद्धतीचा वापर करून अनेक मानसिक आणि शारीरिक रोगांचे निदान करता येते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ देणं कठीण काम होऊन बसलं आहे, तसेच वाढत्या वजनाची समस्या बळावत चालली आहे. त्यामुळे तुम्ही अॅक्युप्रेशर या पद्धतीचा अवलंब करून तुमचे वाढते. वजन आटोक्यात ठेऊ शकता. तसेच या पद्धतीमुळे मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया सुधारता येते, त्याचबरोबर वजनसुद्धा घटवता येते. या चिकित्सेचा अवलंब करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. त्यासाठी तुम्हाला दररोज जमेल तेव्हा तुमच्या बोटांच्या सहाय्याने तुम्ही स्वत: घरच्याघरी जमेल तसं आणि जमेल तेव्हा करू शकता. 

तुमच्या शरिरावरील या चार पॉइंट्सच्या सहाय्याने वजन घटू शकते 
 

ओठ आणि नाकाच्या मधल्या भागाजवळील प्रेशर पॉइंट

तुमच्या ओठ आणि नाकाच्या मधल्या भागावर अंगठ्याच्या सहाय्याने दररोज दोन ते तीन मिनिटं प्रेशर द्या, असे केल्याने तुमच्या त्वचेतील ग्रंथी उत्तेजित होण्यास मदत होते. परिणामी तुमचे वजन देखील काही दिवसातच कमी झाल्याचे तुम्हाला जाणवेल.

 हाताच्या कोपऱ्याजवळील प्रेशर पॉइंट

 तुमचा हात दुमडून कोपऱ्याजवळील एक इंच अंतरावर अंगठ्याने दोन ते तीन मिनिटं दाबा. असे केल्याने तेथील ग्रंथी उत्तेजित होतील परिणामी वजन घटेल.
 

 कानामागील प्रेशर पॉइंट 


 कानाच्या मागील भागाजवळ म्हणजेच जबड्याच्या हाडामागील खोलगट भागाजवळ हा प्रेशर पॉइंट असतो. या भागावर बोटानं खालून वरच्या दिशेने दिवसातून दोन ते तीन वेळा दाब दिल्यास तेथील ग्रंथी उत्तेजित होतील, असे केल्याने भूक नियंत्रणात राहते  वजन आटोक्यात राहील.

 अंगठा आणि अंगठ्या शेजारील खोलगट भागामधील प्रेशर पॉइंट

अंगठा आणि अंगठ्या शेजारील खोलगट भागामधील प्रेशर पॉइंटवर दाब दिल्याने थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात आणि थायरॉइड नियंत्रणात रहाते. थायरॉइडमुळे वजन वाढते, त्यामुळे या प्रेशर पॉइंटच्या सहाय्याने तुम्ही वजन वाढीवर नियंत्रण ठेऊ शकता.


 
अशाप्रकारे अॅक्युप्रेशर  चिकित्सा पद्धतीचा वापर करून तुम्ही लठ्ठपणावर मात करू शकता. परंतु या चिकित्सेसोबतच योग्य आहार आणि थोड्याफार प्रमाणात व्यायाम केल्यास तुम्हाला याचा जास्ती फायदा नक्की मिळेल. या उपचाराने कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. पण सांधेदुखी, संधीवात या सारखे विशिष्ट प्रकारचे आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी