वांग्याचं नाव ऐकून तोंड वाकडं करण्यासाठी ही बातमी महत्त्वाची 

जर का वांग्याचं नाव ऐकून तोंड वाकडं करणाऱ्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की, वांग्यात गुण नसतात. तर जाणून घ्या कोणकोणते गुण वांग्यात असतात. 

Eggplant
वांगं आवडत नाही, मग ही बातमी खास तुमच्यासाठी   |  फोटो सौजन्य: Getty Images

लोकं वांग्यात गुण नसतात असं  म्हणतात. वांग्यातही आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि ते खाण्याचे इतर बरेच फायदे आहेत. वांगं हे कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. खासकरून ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि झोपेशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी तर वांग खूप चांगलं आहे. 

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, वाग्यांच्या भाजीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात आणि ते केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच नव्हे तर आपल्या शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कमतरता दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. वांगी कोणत्याही स्वरूपात खाणे फायद्याचे असते. तर आज आपण या भाजीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घेऊया.

वांग्याचे फायदे

  1. भूक नियंत्रित करते, कारण त्यात जास्त फायबर आणि बिया असतात, यामुळे पोट बर्‍याच काळासाठी भरलेलं राहतं. 
  2. वांग्यात खूप कमी कॅलरीज असतात. एक कप शिजवलेल्या वांग्यातून तुम्हांला ३५ कॅलेरीज मिळतात. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे हे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. 
  3. बर्‍याच मध्य-पूर्वेकडील आणि इटालियन पदार्थांमध्ये वांगी असतात कारण त्यात एरोबिन असते (सालासकट), जे आरोग्यासाठी चांगलं असतं. 
  4. वांगं आयुर्वेदिक औषधाप्रमाणेही कामं करतं. हे निद्रानाश आणि झोपेच्या इतर विकारांना देखील बरे करते.
  5. वांगी मधुमेह नियंत्रित आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामुळे उच्च फायबर आणि लो कार्बची मदत होते.
  6. वांगं हे लोह आणि कॅल्शियमनं समृद्ध असते. अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. 

गॅस आणि संधिवात असलेल्यांनी खाऊ नये

ज्यांना गॅस किंवा संधिवात आहे किंवा ज्यांना स्टोनचा त्रास आहे त्यांनाी वांग्यापासून दूर रहावं. मात्र जे निरोगी आहेत त्यांनी शक्य तितक्या आपल्या आहारात याचा समावेश केला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी