Health Benefits of Pudina । मुंबई : गरमीच्या दिवसात पुदीन्याचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामध्ये पुदिन्याची चटणी, रसात पुदिन्याचा वापर इत्यादींचा समावेश आहे. खर तर पुदिन्याची पाने उष्णतेपासून आराम देण्याचे काम करतात. तसेच पुदिन्याचे सेवन केल्याने काही गंभीर आजारांपासून देखील सुटका मिळते. चला तर म जाणून घेऊया पुदिन्याचे सेवन करण्याचे प्रमुख फायदे. (pudina protects us from these serious diseases).
अधिक वाचा : आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष असणार एकत्र - जयंत पाटील
दरम्यान, पुदीन्याच्या पानांचे सेवन केले जाते, ज्यांना कोरडे किंवा ताजे अशा दोन्ही स्वरूपात वापरले जाते. पुदीन्याचे जास्त सेवन करू नये, अन्यथा ते हानिकारक ठरू शकते. चला तर म जाणून घेऊया नियंत्रित प्रमाणात पुदीना खाण्याचे फायदे.
पुदीन्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते. याव्यतिरिक्त ते लोह, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील प्रदान करते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.
उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे गॅस, पोटदुखी, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय उष्माघाताचा धोकाही कमी होतो.
पुदिन्याचे सेवन केल्याने छातीत जडपणा किंवा दमा यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो. पेपरमिंटमध्ये मिथेनॉल असते, जे वायुमार्ग साफ करण्यास आणि श्लेष्मा काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय पुदिन्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. जेणेकरून तुम्हाला मोकळा श्वास घेण्यास मदत होते.
पुदिन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल असते, जे वेदनांना मारण्याचे काम करते. पुदिन्याच्या पानांपासून काढलेले तेल डोकेदुखीवर उपचार म्हणून लावता येते. जे जळजळ कमी करण्यास आणि ताजेपणा देण्यास मदत करते.
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. लक्षणीय बाब म्हणजे मासिक पाळी दरम्यान महिलांना तीव्र क्रॅम्प आणि वेदनांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पुदिन्याच्या वापराने महिलांच्या वेदना कमी होऊ शकतात.
पुदिन्यात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. पुदिन्याच्या पानांचा वापर करून त्वचा चमकदार आणि निरोगी बनवता येते. त्यामुळे तुम्ही पुदीन्याच्या पानांचा उपयोग फेस क्रिमसाठी देखील करू शकता.