raisins benefits : मनुका खाण्याचे होतात दहा मोठे फायदे, सेक्स पॉवर पण वाढते

raisins benefits in marathi : जाणून घ्या मनुका खाण्याचे फायदे....

health, raisins benefits in marathi, raisins benefits, raisins
raisins benefits : मनुका खाण्याचे होतात दहा मोठे फायदे, सेक्स पॉवर पण वाढते  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • raisins benefits : मनुका खा सेक्स पॉवर वाढते
  • मनुका खाल्ल्याने सौंदर्य आणखी खुलून येण्यास मदत होईल
  • मनुका खाल्ल्याने उत्साहात वाढ होईल, पचनक्षमतेत सुधारणा होण्यास मदत होईल

raisins benefits in marathi : दररोज रात्री झोपण्याआधी दहा मनुका एक वाटी पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी या भिजवलेल्या मनुका खा आणि मनुका भिजवण्यासाठी वापरलेले पाणी प्या. दररोज हा प्रयोग न चुकता करा. काही दिवसांतच काम करण्याच्या उत्साहात वाढ होईल. पचनक्षमतेत सुधारणा होण्यास मदत होईल. तरुण तरुणींचे सौंदर्य आणखी खुलून येण्यास मदत होईल. सेक्स पॉवर वाढण्यास मदत होईल. मनुका खाण्याचे असे अनेक फायदे होतील. चला तर मग जाणून घ्या मनुका खाण्याचे फायदे....

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

  1. एक ग्लास दुधात पाच-दहा मनुका भिजवून त्या मनुका खाल्ल्या तसेच मनुका भिजवण्यासाठी वापरलेले दूध प्यायले तर सेक्स पॉवरमध्ये वाढ होण्यास मदत होईल
  2. मनुका हा एक अँटी ऑक्सिडंट आहेत. मनुका खाल्ल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होईल. शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होईल.
  3. मनुकांमध्ये पोटॅशियम असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना मनुका खाल्ल्यास लाभ होईल.
  4. मनुकांमधील कॅटेचीन अँटी ऑक्सिडंट कॅन्सर रुग्णांसाठी लाभदायी.
  5. वजन वाढविण्यासाठी मनुका लाभदायी.
  6. मनुका खाल्ल्याने पोटाचे विकार, थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
  7. मनुका खाल्ल्याने अॅसिडीटी आणि जळजळ हे त्रास कमी होण्यास मदत होते.
  8. मनुका खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळते यामुळे दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
  9. मनुका खाल्ल्याने निद्रानाशाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 
  10. मनुका खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी