Health Tips: ड्रायफ्रुट्स अनेक प्रकारचे आहेत, त्यापैकी एक आहे किशमिश म्हणजे मुनके. कारण मनुक्यात अँटिऑक्सिडंट्स(Antioxidants)आणि पोषक तत्व (nutrients) भरपूर असते.जेव्हा एखाद्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्याला किशमिश खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात लोह, पोटॅशियम(Potassium), कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. सुक्या मेव्यातून सर्व आवश्यक खनिजे मिळतात. सुका मनुका खाण्याचे काय फायदे आहेत हे आपल्याला माहिती आहे. परंतु मनुक्याचे पाणीही किती लाभदायक आहे, हे बहुतेकांना माहिती नसते, तेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. (raisins water can get rid of these 4 diseases)
अधिक वाचा : महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'
जगात असे अनेक लोक आहेत जे बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांची एकच ओरड असते की पोट साफ होत नाही, तेव्हा त्यांनी रोज सकाळी मनुक्याचे पाण्याचे सेवन केलं पाहिजे. यामुळे पोट पूर्णपणे स्वच्छ राहते आणि गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. मनुक्याचे पाणी पचन चयापचय पातळी कमी करते. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
अधिक वाचा : वयाच्या 86 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग, तरुणांना लाजवणारी बॉडी
अनिरोगी जीवनशैलीमुळे तुमचे वजन वाढत आहे. त्याच्यापासून सुटका म्हणून तुम्ही मनुक्याचे पाणी प्यायले पाहिजे. हे पाणी वजन कमी करण्यास मदत करत असते. यामध्ये असलेले ग्लुकोज आणि फ्रक्टोज शरीराला ऊर्जा देतात. या पाण्याचे सेवन केल्याने भूक कमी लागते आणि शरीरात ऊर्जाही राहते.
अधिक वाचा : राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, संभाजीराजे संतापले
धूळ आणि प्रदूषणाने भरलेल्या या वातावरणात शरीराला डिटॉक्स करणे खूप अवघड आहे. अशा परिस्थितीत मनुक्याचे पाणी शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकत असते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मनुक्याचे पाणी खूप चांगले असते.
विवाहित पुरुषांसाठी मनुका वरदान आहे. डॉक्टर आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की हे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते, ते शुक्राणूंची संख्या देखील वाढवते.
Disclaimer: या लेखात दिलेली सामान्य माहिती कोणत्याही प्रकारे औषध किंवा उपचाराचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा किंवा तज्ञाचा सल्ला घ्या.