Raju Shrivastav : जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांना १० ऑगस्ट रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी (angioplasty) करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर ते बेशुद्ध पडले, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. आता, राजू श्रीवास्तव शुद्धीवर आलेले आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. अजूनही ते डॉक्टरांच्या निगराणीखालीच आहेत.मात्र, त्यांच्यावर करण्यात आलेल्या अँजिओप्लास्टीचे (angioplasty) माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला त्याचीच माहिती देणार आहोत. ( Raju srivastava gains consciousness know the health risks of angioplasty )
चाहत्यांच्या प्रार्थनेला यश
डॉक्टर त्यांचं काम करतंच होते, पण सोबत जोडीला त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते त्यांच्यासोबत होते. राजू श्रीवास्तव यांनी लवकर शुद्धीवर यावे, त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद द्यावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली.
अधिक वाचा : महागड्या वस्तूंच्या नादात 'या' चुका कराल तर होईल पश्चताप!
राजू श्रीवास्तव यांना लवकरात लवकर शुद्ध यावी यासाठी इतर चाहत्यांप्रमाणेच साक्षात बिग बी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत केली. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील परफॉर्मन्स आणि शोमधील ऑडिओ रेकॉर्डिंग राजू यांना ऐकवले गेले. न्यूरोफिजिओथेरपी म्हणून ओळखल्या जाणार्या या प्रक्रियेचा उद्देश श्रीवास्तव कोमात असताना त्यांच्यावर उपचार करण्याचा होता. बिग बींनी श्रीवास्तव यांना एक ऑडिओ मेसेज पाठवून त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आवाजाच्या ध्वनीलहरी त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचणे हा या न्यूरोफिजीओथेरपीचा मुख्य उद्देश होता.
बिग बींप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनी राजू श्रीवास्तव यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेते शेखर सुमन."पुरे झाले राजू. उठ राजू, आणि आम्हा सर्वांना हसायला शिकवत राहा," असे ट्विट त्यांचे सहकलाकार शेखर सुमन यांनी केले. मात्र, हे सगळं असलं तरी राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आहे हेसुद्धा विसरून चालणार नाही.
अधिक वाचा : हे 4 घरगुती उपाय टायफॉइडचा ताप लवकर करतील दूर
अँजिओप्लास्टी किंवा पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन (पीसीआय) ही एक शस्त्रक्रिया आहे. कोरोनरी धमन्या ज्या ब्लॉक झालेल्या असतात त्या पूर्ववत करण्याचं काम ही शस्त्रक्रिया करते. ओपन-हार्ट शस्त्रक्रियेशिवाय हृदयाच्या स्नायूंमध्ये सुरळीत रक्त प्रवाह करण्यासाठी धमन्या रुंद होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत ही शस्त्रक्रिया केली जाते.
अँजिओप्लास्टीसाठी, कॅथेटर म्हणून ओळखली जाणारी एक पातळ आणि लांब ट्यूब रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक केलेल्या कोरोनरी धमनीमध्ये घातली जाते. ट्यूबच्या टोकाला एक लहान फुगा असतो. एकदा तो हृदयाच्या धमनीच्या अरुंद भागात ठेवून फुगवला जातो. रक्त प्रवाहासाठी अधिक जागा तयार करण्यासाठी तो धमनीच्या विरूद्ध बाजूस दाब देतो आणि रक्तप्रवाहासाठी अधिक जागा तयार होते. ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं असलं तरी त्यातही धोका आहेच.
1.कॅथेटरमुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात
2. हृदयाचे ठोके, त्याची लय बिघडू शकते
3. कॅथेटरच्या बाजूला रक्तस्त्राव होऊ शकतो.
4. हृदयविकाराचा झटकाही पुन्हा येऊ शकतो
5. स्ट्रोक येऊ शकतो.
6. कॅथेटर अर्थातच ती ट्यूब जिथे बसवलेली आहे तिथे इन्फेक्शन होण्याचा संभव असतो
7. छाती दुखणे
8. कोरोनरी धमनी फुटणे
9. कोरोनरी धमनी पूर्ण बंद करणे
एकूणंच काय तर अँजिओप्लास्टी करताना किंवा केल्यानंतरही हे धोके उद्भवू शकतात. राजू श्रीवस्तव आता शुद्धीवर आलेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एम्समधील प्रतिष्ठित डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
अधिक वाचा : 'या' 5 गोष्टी तुमच्यासोबत रोज होतात? मग तुमचा संसार धोक्यात
( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )