Ramadan 2023 Roza Benefits: यावर्षी, रमजानचा पवित्र महिना 24 मार्चपासून सुरू झाला आहे जो 23 एप्रिलला संपणार आहे. म्हणून यंदाची ईद-उल-फित्र 24 एप्रिल रोजी साजरी होण्याची अपेक्षा आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजान महिना उन्हाळ्यात येतो. या संपूर्ण महिन्यात, इस्लामवर विश्वास ठेवणारे लोक कडक उपवास पाळतात ज्यात ते दिवसभरात 12-15 तास काहीही न खाता किंवा न पिता राहतात. यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. हे उपवास पाळण्याचे धार्मिक महत्त्व असले तरी त्याचे अनेक फायदे आहेत. जे उपवास करतात त्यांना मानसिक ते शारीरिक आरोग्यापर्यंत अनेक फायदे होतात. अशाच काही फायद्यांबद्दल आज आपण जाणून घेवूया... (Ramadan 2023: Fasting during Ramadan has benefits for mental and physical health)
आजकाल आपली जीवनशैली दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याचा परिणाम असा आहे की लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनत आहे परंतु आपण रमजान महिन्यात उपवास करून आपले वजन जलद कमी करू शकता. एका संशोधनानुसार, उपवासात 12 तासांपेक्षा जास्त वेळ सतत रिकाम्या पोटी राहिल्याने आपले वजन झपाट्याने कमी होते.
अधिक वाचा: Belly Fat: लाख प्रयत्न करूनही पोटाचा घेर कमी होत नाही? कारण तुम्ही 'या' चूका करत आहात
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रोजा पाळल्याने आपले वजन कमी होते, त्यासोबतच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही सामान्य राहते. ही प्रक्रिया आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते.
दीर्घकाळ उपवास केल्याने शरीराला स्वतःला डिटॉक्स करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. या दरम्यान आपली पचनसंस्था सुस्थितीत राहते आणि शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर पडतात.
अधिक वाचा: त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय, जाणून घ्या कोणती आहे 'ही' औषधी वनस्पती
तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडून पुढे जायचे असेल तर रमजानचा महिना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. उपवास दरम्यान काहीही खाणे किंवा पिणे पूर्णपणे निषिद्ध आहे. यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या अहवालानुसार, जर तुम्हाला धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूचे व्यसन सोडायचे असेल, तर रमजान हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे.
अधिक वाचा: MOUNI ROY प्रमाणे घ्या त्वचेची आणि केसांची काळजी, नैसर्गिक ग्लोसाठी ट्राय करा न्यु ट्रिक्स
कमी अन्न खाल्ल्याने आणि सतत महिनाभर देवाचे ध्यान केल्याने तणावासारख्या मानसिक आजारापासून दूर जाण्यास मदत होते आणि आपल्याला बरे वाटते.