Mouth Odor: तोंडाला दुर्गंधी येते? हे तीन अवयव असतात कारण, वाचा सविस्तर

दात आणि तोंडाची सफाई न केल्यामुळे श्वासांना दुर्गंधी येतेच, मात्र त्याशिवाय इतरही अनेक कारणं त्यामागे असू शकतात. काही अवयवांचं कार्य बिघडलं, तरीही श्वासांना वास यायला सुरुवात होते.

Mouth Odor
तोंडाच्या दुर्गंधीमागे तीन अवयव कारणीभूत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दात आणि तोंडाच्या सफाईअभावी येतो श्वासांंना वास
  • इतरही काही कारणांमुळे येते तोंडाला दुर्गंधी
  • श्वासांची दुर्गंधी असू शकते गंभीर आजाराचं लक्षण

Mouth Odor: आपल्या तोंडाला येणारी दुर्गंधी (Mouth Odor) ही एक मोठी समस्या असते. ही समस्या आपल्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांना अधिक जाणवत असते. ज्या व्यक्तीच्या तोंडाला दुर्गंधी येते, त्याच्यापासून अनेकजण दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. साधारणतः दातांची आणि तोंडाची नीट साफसफाई (Cleaning of teeth and mouth) न केल्याचा हा परिणाम असतो. दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं दातांच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. मात्र काहीजण त्यातही टाळाटाळ करत असल्याचं दिसतं. त्यामुळे तोंडात बॅक्टेरिया उत्पन्न होतात आणि दुर्गंधी यायला सुरुवात होते. मात्र तोंडाला दुर्गंधी येण्याचं केवळ हेच एक कारण नसतं. इतरही अनेक कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी येण्याची शक्यता असते. जर आपल्या शरीरातील इतर काही अवयवांचं आरोग्य बिघडलं असेल, तरीही तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवते. 

फुफ्फुसे (Lungs)

फुफ्फुसात इन्फेक्शन झालं असेल, तर तोंडाला वास यायला सुरुवात होते. जेव्हा फुफ्फुसात कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होतं, तेव्हा कफ बाहेर पडायला सुरुवात होते. हा दुर्गंधी घटक असल्यामुळे आपल्या श्वासांनाही त्याचा वास येण्यास सुरुवात होते. त्यामुळे तोंडाची आणि दाताची नीट साफसफाई केली तरीही तोंडाला वास येतच राहतो. 

अधिक वाचा - Mood swing remedies: वारंवार का होतात मूड स्विंग? करा हे सोपे उपाय

यकृत (Liver)

यकृताचा आजारदेखील श्वासांच्या दुर्गंधीसाठी कारणीभूत ठरू शकतो. आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम लिव्हर करत असतं. मात्र त्यावर जेव्हा अतिरिक्त दबाव येतो, तेव्हा विषारी घटक अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागतात. त्यामुळे आपल्या मुखातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. 

किडणी

जर तुम्हाला किडणीशी संबंधित काही विकार असेल, तर त्यामुळे तोंड कोरडं पडायला सुरुवात होते. किडणीचं कार्य सुरळीत सुरू असेल, तर युरिया फिल्टर करण्याचं काम नीट सुरू राहतं. मात्र त्यात काही विकार निर्माण झाला, तर या कामात अडथळे येऊ लागतात. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. 

अधिक वाचा - Causes of Paralysis:खबरदार तुम्हालाही होऊ शकतो अर्धांगवायू? पाहा का होतो अर्धांगवायू आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय

इतर कारणांमुळेही दुर्गंधी

याशिवाय तोंडातून दुर्गंधी येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडातून दुर्गंधी यायला सुरुवात होणं, हे मधुमेहाचं लक्षण मानलं जातं. रक्तातील साखरेची पातळी वाढत चालल्याचं हे प्राथमिक लक्षण मानलं जातं. या अवस्थेत तोंडातून ॲसिटोनसारखा दुर्गंध यायला सुरुवात होते. रक्तातील किटोन्सची पातळी वाढणं, हे यामागील मुख्य कारण असतं. अशा वेळी तातडीने रक्तातील साखरेची पातळी तपासण्याचा सल्ला दिला जातो. योग्य वेळी तपासणी केली, तर गंभीर स्वरुपाचा मधुमेह होण्यापासून बचाव करता येऊ शकतो.

डिस्क्लेमर - तोंडाला येणाऱ्या दुर्गंधींच्या कारणांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी