Foot pains : पाय दुखण्याची असू शकतात ही महत्त्वाची कारणं, साध्या उपायांनी सुटेल समस्या

अनेकांना सलग काही तास एकाच जागी बसण्याची सवय असते, तर अनेकांना कामामुळे सलग काही तास उभं राहावं लागतं. या दोघांनाही पायदुखीची समस्या उद्भवू शकते.

Foot pains
पाय दुखण्याची असू शकतात ही महत्त्वाच कारणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सलग उभे राहण्यामुळे दुखतात पाय
  • एकाच जागी बसल्यामुळेही सुरू होते पायदुखी
  • सोप्या उपायांनी मिळतो दिलासा

Foot Pains : अनेकदा सलग अनेक तास एकाच जागी बसल्यामुळे (Sitting at one place) पाय दुखायला (Pain in foot) सुरुवात होते. पाय दुखणं ही एक कॉमन समस्या असून घरोघरी अनेकांचे पाय दुखत असल्याचं आढळतं. चुकीची लाईफस्टाईल (Lifestyle) आणि पाय एकाच अवस्थेत राहिल्यामुळे ते दुखू लागतात. पाय काही काळ दुखले आणि लगेच थांबले तर ही सामान्य पायदुखी मानली जाते. मात्र जर पाय सलग बराच काळ दुखत असतील आणि लगेच या वेदना कमी होत नसतील, तर मात्र त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असते. एकाच जागी अनेक तास काम करत बसणे, एकाच जागी कित्येक तास उभं राहणे यासारख्या कारणांमुळे पाय दुखायला सुरुवात होते. जाणून घेऊया पाय दुखण्याची काही कारणं आणि त्यावरचे काही घरगुती उपाय. 

एकाच जागी बसणे

एकाच जागी बराच वेळ बसल्यामुळे पाय दुखण्याच्या त्रासाला सुरुवात होते. अनेकदा कार्यालयात काम करणारे आणि बैठं काम करणारे अनेकजण दिवसभर एकाच जागी बसून काम करतात. विशेषतः खुर्चीवर बसून काम कऱणाऱ्यांना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवत राहतो. तासन्‌तास एकाच खुर्चीवर एकाच अवस्थेत बसल्यामुळे पाय दुखू लागतात. गुडघे आणि इतर सांधे त्यामुळे आखडतात आणि त्याची वजन सहन करण्याची क्षमता कमी होऊ लागते. अनेक तास एकाच अवस्थेत बसून अचानक उठल्यानंतर पायांवर येणारा ताण सहन न झाल्यामुळे पाय दुखायला सुरुवात होते. त्यामुळे सलग आठ ते नऊ तास काम केलं, तरीही थोड्या थोड्या वेळानंं कामातून ब्रेक घेणं आणि पायांना व्यायाम देणं गरजेचं आहे. दर एका तासाने उठून थोडा वॉक घेतला तरी ही समस्या उद्भवणार नाही. 

एकाच जागी उभे राहणे

दीर्घकाळ एकाच जागी बसल्यामुळे जसा त्रास होतो, तसाच दीर्घकाळ एकाच जागी उभं राहिल्यामुळेदेखील पाय दुखू लागतात. एकाच जागी आणि एकाच अवस्थेत सलग काही तास तुम्हाला उभं राहावं लागलं, तर पायांच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे पाय दुखायला सुरुवात होते. विशेषतः ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असतं, त्यांना तर याचा फारच त्रास होतो. त्यामुळे उभं राहणं अपरिहार्य असेल तरी पायांची हालचाल करत राहणं आणि मधून मधून स्ट्रेचिंग करत राहणं गरजेचं आहे. 

अधिक वाचा - Weight Loss: Belly Fat कमी करण्यासाठी खास पाच सोप्या Tips, सहज कमी होईल पोटावरील चरबी

लोह कमी होणं

चुकीची जीवनशैली आणि सदोष आहारपद्धतीमुळे शरीरातील लोहाचं प्रमाण कमी झालं तरीही पाय दुखायला सुरुवात होते. शरीरातील लोहाचं प्रमाण कमी झाल्यामुळे स्नायू शिथिल आणि कमजोर होतात. त्यामुळे पाय दुखू लागतात. 

अधिक वाचा - Actress Fitness Secrets: 'या' अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य आणि डाएट प्लॅन आला समोर

करा हा उपाय

पाय शेकणं, हा पाय दुखण्यावरचा जालीम घरगुती उपाय आहे. गरम पाण्यात सैंधव मीठ घालून त्या पाण्याने पाय शेकण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या गुडघ्यावरून हे पाणी पायाच्या घोट्यापर्यंत ओघळेल, अशा पद्धतीने ओतत राहावं. दररोज साधारण 5 मिनिटं हा उपाय केला, तर पाय दुखण्याची समस्या नियंत्रणात येऊ शकते. 

डिस्क्लेमर - पायदुखी थांबवण्याचे हे घरगुती उपाय आणि टिप्स आहेत. तुम्हाला यासंबंधी काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी