हृदयविकाराचे कारण ठरू शकतात सप्लिमेंट्स , जाणून घ्या काय सांगतंय संशोधन

तब्येत पाणी
Updated Jul 22, 2019 | 13:18 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सप्लिमेंट्स म्हणून वापरण्यात येणारे व्हिटॅमिन, मिनरल यांचं सेवन करणं फायदेशीर नसून ते आरोग्यासाठी अनेक बाबतीत घातक ठरू शकतं. यावर डॉक्टर्स आणि संशोधकांचं काय मतं आहेत ते जाणून घेऊयात...

Supplements
रिसर्च: हृदयविकारासाठी सप्लिमेंट ठरू शकतात कारण 

थोडं पण कामाचं

  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीनं समृद्ध असलेले सप्लिमेंट्स हृदयविकाराचे कारण बनू शकतात
  • सप्लिमेंटचा हृदयावर कोणताच सकारात्मक प्रभाव पडत नाही
  • आहारात फळे, हिरव्या भाज्या त्याचबरोबर सात्विक आहाराचा समावेश करा

नवी दिल्ली : आजकाल अनेकदा आपण शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर त्याचे सप्लिमेंट्स वापरतांना पाहिलं असेल. शरीरात एखाद्या व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची कमी भरून काढण्यासाठी हे सप्लिमेंट्स दिले जातात. अनेकदा वजन कमी करणाऱ्या व्यक्तीही सप्लिमेंट्सचा आधार घेतांना आपण पाहिलं असेल. पण कधीकधी सप्लिमेंट्स फायदेशीर न ठरता शरीराला घातक ठरू शकतात.  संशोधकांच्या म्हणण्यानुसार पूरक आहार म्हणून व्हिटॅमिन, मिनरलचं सेवन करणं हृदयासाठी कधीच फायदेशीर नाहीत, तर असं सेवन करणं बऱ्याच बाबतीत हानीकारक ठरू शकतं.

अॅनल ऑफ इंटर्नल मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, पूरक आहार ज्याला सप्लिमेंट म्हणून ओळखलं जातं, हे जर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी नं युक्त असेल तर यामुळं आपल्याला हृदयविकारासाठी कारणीभूत ठरू शकतं.

या संदर्भात खरंतर तसा कोणताच पुरावा नाही की, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीचा आपल्या स्वास्थ्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होतो. वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर सैफी यू यांनी आपल्या संशोधनामध्ये सांगितलं आहे की, आहारातील काही हस्तक्षेपामुळे हृदयाच्या आरोग्यावर प्रभाव पडू शकतो आणि मृत्यूही ओढवू शकतो.

हृदयावर सकारात्मक प्रभाव नाही

गाझियाबादमधील कोलंबिया आशिया हॉस्पिटलचे कंसल्टन्ट कार्डिओलॉजिस्ट अभिषेक सिंह यांनी सांगितलं की, सप्लिमेंटचा हृदयावर कोणताच सकारात्मक प्रभाव पडत नाही. सिंह पुढे म्हणाले, ‘हृदयासंबंधातील गुंतागुंत टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हृदयासाठी चांगलं नसलेलं अन्न टाळावं’.

सिंह यांच्या मते, सप्लिमेंट्समध्ये ट्रान्स फॅटी अॅसिड असतात. त्याचबरोबर आपल्याला कार्बोहयड्रेडचं सेवन देखील मर्यादित करावं लागतं. सिंह यांच्या मते, लोकांना निरोगी हृदयासाठी अधिकाधिक हिरव्या भाज्या खाणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आणि नायट्रेट असतं. जे धमन्यांचा बचाव करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

सप्लिमेंटच्या ऐवजी, हिरव्या भाज्या

नवी दिल्लीतील क्लिनिकल न्यट्रिशिअनिस्ट, डायटिशिअन रजत त्रेहन यांनी सांगितलं की, उत्तम लाईफस्टाईलसाठी हिरव्या भाज्या आणि फळे यावर अवलंबून राहणं सर्वोत्तम उपाय आहे. त्याच बरोबर, हृदय उत्तम ठेवण्यासाठी दररोज व्यायाम आणि योग करणं देखील गरजेचं आहे. तसंच, सप्लिमेंटच्या नावावर शरीराला असंतुलित करणाऱ्या पदार्थांचं सेवन टाळलेलंच चांगलं.

त्रेहन म्हणतात, सप्लिमेंटच्या झंझटीपासून दूर राहा आणि आहारात फळे, हिरव्या भाज्या तसंच सात्त्विक अन्नाचा समावेश करा. असं केल्यानं, कोणतेही आजार आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाच्या जवळ फिरकू शकत नाही.

नोट: वरील बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला सामान्य माहिती आहे, याचा आपल्याला वापर करायचा असल्याच त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
हृदयविकाराचे कारण ठरू शकतात सप्लिमेंट्स , जाणून घ्या काय सांगतंय संशोधन Description: सप्लिमेंट्स म्हणून वापरण्यात येणारे व्हिटॅमिन, मिनरल यांचं सेवन करणं फायदेशीर नसून ते आरोग्यासाठी अनेक बाबतीत घातक ठरू शकतं. यावर डॉक्टर्स आणि संशोधकांचं काय मतं आहेत ते जाणून घेऊयात...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...