Diabetes Tips : लाल पालक रक्तातील शुगर लेवल करते नियंत्रित, जाणून घ्या फायदे

तब्येत पाणी
Updated Apr 16, 2023 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Diabetes Diet: डॉक्टर रुग्णांना त्यांच्या आहारात कमी ग्लायसेमिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कमी ग्लायसेमिक पदार्थ रक्तातील साखर सहज नियंत्रित करतात. या पदार्थांमुळे ग्लुकोजच्या पातळीत अचानक वाढ होत नाही. अशा पदार्थामुळे जास्त काळ पोट भरलेलं रहाते. 

Red spinach controls blood sugar levels know the benefits
लाल पालक रक्तातील शुगर लेवल करते नियंत्रित  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • लाल पालक ही एक प्रकारची पालेभाजीच आहे.
  • ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम अन्न आहे.
  • लाल पालक फायबरने समृद्ध आहे.

Diabetes Control Diet: मधुमेहाच्या रुग्णांना निरोगी राहण्यासाठी किंवा कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी सातत्याने ब्लड शुगरवर लेव्हल अर्थात रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी जीवनशैलीत बदल केल्यास, तणावापासून दूर राहिल्यास, आहारावर अन् त्यातही गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवल्यास आणि शरीराची सतत हालचाल ठेवल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण सहज नियंत्रित करता येतं. (Red spinach controls blood sugar levels know the benefits)

डॉक्टर रुग्णांना त्यांच्या आहारात कमी ग्लायसेमिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कमी ग्लायसेमिक पदार्थ रक्तातील साखर सहज नियंत्रित करतात. या पदार्थांमुळे ग्लुकोजच्या पातळीत अचानक वाढ होत नाही. अशा पदार्थामुळे जास्त काळ पोट भरलेलं रहाते. 

थोडक्यात काय तर मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहार हा घटक सर्वात महत्वाचा आहे. म्हणून आज आपण मधुमेहाच्या रुग्णांना वरदान ठरलेल्या भाजीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे रक्तातील शुगर लेवल मेंटेन करता येईल. तर या भाजीचे नाव म्हणजे लाल पालक. 

अधिक वाचा: World Voice Day 2023: निसर्गाची अनमोल देणगी म्हणजे आवाज... जाणून घ्या याचा इतिहास आणि महत्व

लाल पालक ही एक प्रकारची पालेभाजीच आहे. हिरव्या पालकासारखीच ही भाजीही शिजवून खाल्ली जाते. उन्हाळ्यात मिळणारी ही पालेभाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी ठरते. ही पालेभाजी अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत म्हणून ओळखली जाते. त्यात अँथोसायनिन असते जे भाजीला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण रंग देते.

मधुमेहींसाठी लाल पालक हा चांगला पर्याय?

लाल पालकामध्ये कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम अन्न आहे. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे जो रक्तातील साखरेमध्ये वेगाने वाढ होऊ देत नाही. याशिवाय, लाल पालक फायबरने समृद्ध आहे. यामुळे ग्लुकोज शोषण कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी प्रभावीपणे मदत होते. मधुमेह विरोधी गुणधर्म  असलेली फ्लेव्होनॉइड्स सारखी रसायने या भाजीत आढळतात. 

अधिक वाचा: Weight Loss Yoga: योगा से ही होगा ! हे नियमित 5 आसन करतील वजन कमी

लाल पालक खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?

लाल पालक खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कच्चा किंवा थोडासा शिजवलेला. जरी ही भाजी अनेक प्रकारे शिजवली जाऊ शकते. काहींना हा पालक कच्चा खायला आवडतो, तर काहींना तो उकळून खातात. ज्यांना ते कच्चे खायचे आहे ते सॅलड आणि सँडविचच्या रूपात ते खातात. काही लोक या पालकाच्या पानांची स्मूदी देखील करतात.

टिप- या लेखात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ही स्वीकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांता सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी