Red wine benefits: रेड वाईनचे असंख्य फायदे, त्वचा होईल मुलायम

Red wine skin benefits: रेड वाईन ही त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरते. रेड वाईनमध्ये असलेले घटक खूपच फायदेशीर ठरतात. 

red wine benefits for skin read in marathi
Red wine benefits: रेड वाईनचे असंख्य फायदे, त्वचा होईल मुलायम (Photo: BCCL, TOI) 

Red wine health benefits: रेड वाईन आरोग्यासाठी फायदेशीर नाहीये मात्र, आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. त्वचेच्या संदर्भात असलेल्या समस्यांवर रेड वाईन हा एक चांगला उपाय आहे. रेड वाईन चेहऱ्यावर चमक घेऊन येते आणि त्यासोबतच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासही मदत करते. (red wine benefits for skin read in marathi)

वाढत्या वयात चेहऱ्यावर दिसणारे वृद्धात्वाचे प्रभाव, सुरकुत्या पडणे या सारख्या समस्या दूर करण्यासही खूप फायदेशीर ठरते. रेड वाईनमध्ये असलेले जंतुनाशक गुणधर्म हे खूप फायदेशीर असतात आणि आरोग्याला लाभ देतात. चेहऱ्यावरील मुरुम आणि पिंपल्सच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी वाईन प्रभावी ठरते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा या काढून टाकण्यासही मदत करते. रेड वाईनमध्ये फ्लेवनॉयड्स आणि टॅनिन असतात जे वाढत्या वयात वृद्धत्त्वाच्या लक्षणांसोबत लढण्यास मदत करतात. जाणून घेऊयात रेड वाईनचा आपल्या स्किनवर कसा वापर करु शकतो.

हे पण वाचा : लाल रंगाची ही फळे-भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर, मिळतात असंख्य फायदे

रेड वाईन ही एक बेस्ट सनस्क्रीन

रेड वाईन ही एक उत्तम सनस्क्रीन प्रमाणे काम करते. रेड वाईनमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अमिनो अ‍ॅसिड्स हे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करणारे थर बनवते. यामुळे सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारे दुखापत किंवा इजा होत नाही.

हे पण वाचा : थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाचा

रेड वाईन कशी वापरावी

त्वचा निस्तेज दिसू लागल्यावर चेहऱ्यावर रेड वाईन लावा आणि हलकाचा मसाज करा. चेहऱ्यावर रेड वाईनने मसाज करण्यासाठी वाईन हातावर घेऊन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. त्यानंतर एक तासापर्यंत चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची क्रीम किंवा पावडर लावू नका.

हे पण वाचा : या आहेत 2023 मधील लकी राशी, होईल पैशांचा वर्षाव

रेड वाईन त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. चेहऱ्यावरील मृत आणि निस्तेज त्वचा काढून टाकण्यासाठी तुम्ही रेड वाईनचा पॅक वापरू शकता. हा पॅक तयार करण्यासाठी दोन झाकण रेड वाईनमध्ये 2 चमचे तांदूळ मिसळा किंवा एक चमचा साखर मिसळा. हे केल्यावर ते मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. जवळपास अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी