Cholesterol: अशी खा लसूण, एकाच दिवसांत १० टक्के संपून जाईल खराब कोलेस्ट्रॉल

तब्येत पाणी
Updated May 05, 2022 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. मात्र घरात असलेल्या लसूणच्या मदतीने तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. 

garlic
अशी खा लसूण, एकाच दिवसांत १० टक्के संपेल खराब कोलेस्ट्रॉल 
थोडं पण कामाचं
  • कोलेस्ट्रॉल हे रक्तांच्या वाहिन्यांमध्ये जमा होणारा मेणासारखा पदार्थ असतो.
  • वाहिन्यांमध्ये याचे प्रमाण वाढल्यास त्या ब्लॉक होण्याचा धोका असतो.
  • खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.

मुंबई: कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढणे ही आजकालची सामान्य समस्या बनली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आणि सुस्त जीवनशैलीमुळे अनेकजण या समस्येने ग्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात चांगले आणि वाईट. चांगले कोलेस्ट्रॉल हे चांगल्या कामकाजासाठी गरजेचे आहे तर वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने तुम्हाला हृदयाचे आजार, स्ट्रोक आणि हार्ट अॅटॅकसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.Reduce bad cholestrol with the help of garlic

अधिक वाचा - एक महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात No Change

कोलेस्ट्रॉल हे रक्तांच्या वाहिन्यांमध्ये जमा होणारा मेणासारखा पदार्थ असतो. वाहिन्यांमध्ये याचे प्रमाण वाढल्यास त्या ब्लॉक होण्याचा धोका असतो. यामुळे शरीरातील रक्ताचा संचार कमी होऊ शकतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. मात्र घरातील लसूण वापरूनही तुम्ही हे कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. 

कोलेस्ट्रॉलवरील रामबाण उपाय लसूण

एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार अनेक मानव संशोधनातून हे समोर ाले आकी कच्चा लसूण कार्डिओव्हस्क्युलर डिसीजसाठी चांगल्या पद्धतीने काम करतो. लसूण हा एलडीएल-सी आणि ट्रायग्लिसराईज लेव्हा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. दररोज लसणाची अर्धा ते एक पाकळी सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी साधारण १० टक्क्यांपर्यंत कमी होते. 

लसूणची अर्धी पाकळीच पुरेशी

शरीरात जमा असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही दररोज लसणाची अर्धी पाकळी खाल्ली पाहिजे. यासाठी लसूण पावडरचा वापर करू नका. पावडर बनवल्याने त्यातील सक्रिय योगिको संपतात. 

अधिक वाचा - raisins benefits : मनुका खा सेक्स पॉवर वाढते

लसणामध्ये ह्यूमन ३ हायड्रॉक्सी ३ मिथाईलग्लुटरीएल-कोएन्झाईम एआणि स्क्वॅलीन मोनोऑक्सिजिनेज सारखी तत्वे आढळतात जे कोलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करतात. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी