Belly Fat reduce: पोटाची चरबी कमी करायचीय? मग दररोज करा हे छोटे काम

Tips to reduce belly fat: पोटाची चरबी किंवा वाढलेलं पोट अनेकांची समस्या ठरते. तुम्हालाही समस्या जाणवतेय का? काळजी करु नका काही टिप्सने तुम्ही ही चरबी आणि वाढलेलं पोट नक्कीच कमी करू शकता.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India

Health news marathi: असे अनेक आजार आहेत जे आपल्या कळत-नकळत वाढत जातात आणि लोकांना त्याबाबत माहिती सुद्धा होत नाही. हे आजार आपल्या खाण्याच्या सवयी आणि आळसामुळे होतात. अनेकांसाठी वाढलेलं पोट किंवा पोटाची चरबी हे चिंतेचे मुख्य कारण ठरत आहे. अस्वच्छ अन्न खाणे, खराब जीवनशैली आणि दिवसभर लॅपटॉपसमोर बसणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत. यामुळे आपल्या पोटात चरबी जमा होते. आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुदृढ राहण्यासाठी आणि आजारापासून मुक्ती मिळवायची असेल तर आम्ही तुम्हाला काही व्यायामांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या पोटांच्या स्नायूंवर काम करतात आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही दररोज ३० मिनिटे व्यायाम केलात तर पोटाची वाढलेली चरबी तुम्ही कमी करू शकता. (reduce belly fat with doing these exercise and yoga)

भुजंगासन : भुजंगासनाला सर्पसन, कोब्रा आसन किंवा सर्प आसन असेही म्हणतात. या आसनात शरीराचा आकार सापासारखा बनतो. हे आसन जमिनीवर झोपून आणि पाठ वाकवून केले जाते. तर डोके सापाच्या फण्यासारख्या स्थितीत असते. भुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपा आणि पाय एकमेकांपासून दूर ठेवा. नंतर हात वर पसरवा. यानंतर तुमचे दोन्ही पाय जोडून कपाळ जमिनीवर ठेवा. नंतर आपले कोपर शरीराच्या जवळ ठेवून आपले हात आपल्या खांद्यांच्या खाली घ्या. मग दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू शरीराच्या वरचा भाग उचला. या आसनात ४ ते ५ सेकंद श्वास घ्या आणि मग बाहेर सोडा.

धनुरासन : या आसनात शरीर धनुष्याच्या आकारात राहते आणि म्हणून त्याला धनुरासन म्हणतात. धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा आणि पाय सरळ पसरवा. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यांपेक्षा वर वाकवा आणि दोन्ही हातांनी पायाचे तळवे पकडा. यानंतर श्वास घेताना, डोके, छाती, मांड्या, गुडघे, पाय हात वर करा. नंतर थोड्यावेळाने श्वास सोडा.

नौकासन : हे आसन करताना एका नौके प्रमाणे शरीराचा आकार असतो. नौकासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर झोपा. नंतर कमरेपासून डोक्यापर्यंतचा भागही वर करा आणि आपले पाय वर घ्या. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन आसन सुरू करा.

अधिक वाचा : Eye care : डोळ्यांच्या आरोग्यासाठी करा हे सोपे उपाय...

कुंभकासन : हे आसन पोटाची चकबी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात कामी येते. कुंभकासन करण्यासाठी जमिनीवर गुडघे टेका. त्यानंतर आपले हात मांडेवर ठेवा आणि हे आसन सुरू करा.

सरळ झोपून पाय वर-खाली करा : तुम्ही हे आसन अगदी सोप्या पद्धतीने करु शकता. सर्वप्रथम पाठीवर झोपा. मग तुमचे पाय सरळ आणि एकत्र ठेवा. नंतर आपले हातही शरीराच्या दिशेनेच पसरवा. मग तुमचे पाय वर उचला. यानंतर हळूहळू पाय जमिनीवर आणा. नंतर २-३ सेकंद थांबा आणि नंतर पुन्हा तिच क्रिया करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी