Diet chart for weight loss: भाज्यांचे डाएट असे करा फॉलो, एका महिन्यात ५ किलोपर्यंत वजन होऊ शकते कमी

तब्येत पाणी
Updated May 06, 2022 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss: वाढते वजन केवळ शरीराची सुंदरता बिघडवत नाही तर डायबिटीज आणि हार्टसंबंधी आजाराचेही कारण ठरतात. वजन कमी करण्यासाठी जितकी एक्सरसाईज करणे गरजेचे असते तितकेस योग्य डाएट घेणे. 

weight loss
भाज्यांच्या डाएटने १ महिन्यांत ५ किलोपर्यंत वजन करू शकता कमी 
थोडं पण कामाचं
 • वजन घटवण्यासाठी दलिया फायदेशीर
 • या वीकली डाएट चार्टला फॉलो करून करा वजन कमी
 • कोणत्या हिरव्या भाज्यांनी घटणार वजन

मुंबई: हल्ली आरोग्याची(health) सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे वजन वाढणे. वाढते वजन(weight gain) कमी करण्यासाठी अनेकजण कमी खाणे आणि एक्सरसाईजवर(exercise) लक्ष देतात. मात्र असे केल्याने वजन कमी होईलच मात्र शरीरात थकवा जाणवेल. थकव्याची ही स्थिती नको असेल तर आपल्या डाएटवर लक्ष देणे गरजेचे असते. ज्यामुळे वजनही कमी होईल आणि थकवाही येणार नाही. हेल्थ एक्सपर्ट्स वजन घटण्यासाठी हिरव्या भाज्या आणि दलियाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी अशा भाज्यांचे सेवन केले पाहिजे ज्यात प्रोटीन्स-व्हिटामिन्स आणि गरजेची पोषकतत्वे असतील मात्र कॅलरीज नसतील. Reduce upto 5 kg weight with this diet chart

अधिक वाचा - उष्माघातापासून रक्षण करते कांद्याचे सरबत

वेट लॉससाठी एक आठवडा फॉलो करा हे डाएट प्लान

जे लोक दीर्घकाळापासून वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यानंतरही त्यांना रिझल्ट भेटत नाही आहे. ते हा डाएट चार्ट फॉलो करू शकता. या चार्टमध्ये तुम्ही वय, वजन आणि आवडीच्या हिशेबाने काही बदल करू शकता. 

रविवार

 1. नाश्त्यामधये तुम्ही दलिया हिरव्या भाज्यांसोबत खाऊ शकता. यामुळे तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही तसेच शरीरात एनर्जी राहील. 
 2. दुपारच्या जेवणात चपातीसह भाज्यांचे सूप घ्या
 3. रात्रीच्या जेवणात दलिया अथवा व्हेजिटेबल सूप अथवा ग्रीन व्हेजिटेबल्स सलाड खाऊ शकता. 

सोमवार

 1. नाश्त्यामध्ये दलिया अथवा इडलीसह सांबार.
 2. दुपारच्या जेवणात मिक्स भाजी आणि चपाती था. 
 3. रात्रीच्या जेवणात ताज्या पालकसह अन्य भाज्यांचे सलाड खाऊ शकता. 

मंगळवार

 1. नाश्त्यात मिक्स भाजीसह चणाडाळीचे पॅनकेक्स खा.
 2. दुपारच्या जेवणात ब्राऊन राईससह कमी तेलातील छोलेची भाजी.
 3. रात्रीच्या जेवणात मोड आलेल्या कडधान्यांच्या सलाडसह दलियाय

बुधवार

 1. नाश्त्यामध्ये फ्रुट सलाड अथवा दलिया.
 2. दुपारच्या जेवणात मिक्स ग्रीन व्हेजिटेबल आणि धान्याची भाकरी. 
 3. रात्रीच्या जेवणात बासमती भातासह ग्रीन सॅलड.

गुरूवार

 1. नाश्त्यामध्ये बदाम घातलेला दलिया. दलियासोबत एक ग्लास दुधही घेऊ शकता. 
 2. दुपारच्या जेवणात मिक्स भाजीसह चपाती आणि ग्रीन सॅलड.
 3. रात्रीच्या जेवणात पालक पनीरसह ब्राऊन राईस खाऊ शकता. 

शुक्रवार

 1. नाश्त्यात फ्रुट सॅलडसह एक ग्लास दूध
 2. दुपारच्या जेवणात ब्राऊन राईससह सांबर.
 3. रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल्स दलियासह व्हेजिटेबल दलिया खाऊ शकता. 

अधिक वाचा - २०२३ पर्यंत राहू मंगळ राशीत राहणार, वाचा सविस्तर

शनिवार

 1. नाश्त्यात इडली सांबार अथवा पनीर दलिया. 
 2. दुपारच्या जेवणारत राजमा करी आणि क्विनोआसह व्हेजिटेबल सलाड.
 3. रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सलाडसह दलियाय 

डिस्क्लेमर: प्रस्तुत लेखात दिलेल्या टिप्स आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीच्या आधारे आहेत. यातील कोणत्याही टिप्स फॉलो करण्याआधी अथवा डाएटमध्ये बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी