पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी प्या लिंबू आणि मधाचा काढा, घरी तयार करण्याची सोपी पद्धत

Lemon-honey decoction: काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कमी करू शकता. तुम्ही घरी राहून लठ्ठपणापासून मुक्ती मिळवू शकता, तर चला जाणून घेऊया.

Lemon-honey decoction
वजन कमी करण्याच्या टीप्स 
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा आधार घेतला जातो.
  • वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वाढलेलं वजन कमी (healthy diet) करण्यासाठी जेवढं हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे.
  • पावसाळ्यात व्यायामासाठी घराबाहेर जाणं थोडं कठीण आहे.

मुंबई: Lemon-Honey Decoction: वजन कमी (Lose Weight)  करण्यासाठी आजकाल लोकं बरंच काय काय करत असतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा आधार घेतला जातो. या पद्धतीत आहारापासून व्यायामापर्यंत जवळपास प्रत्येक पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. मात्र वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वाढलेलं वजन कमी (healthy diet) करण्यासाठी जेवढं हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे. तेवढंच व्यायाम करणंही आवश्यक आहे. पण सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात व्यायामासाठी घराबाहेर जाणं थोडं कठीण आहे. अशा वेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कमी करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही घरी राहून लठ्ठपणापासून मुक्ती मिळवू शकता, तर चला जाणून घेऊया. 

पावसाळ्याच्या दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

लिंबू आणि मध

वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मध एकत्र मिसळून पिणं खूप फायदेशीर मानले जाते. ही अशी पद्धत आहे जी कोणत्याही ऋतूत वापरता येते. पण पावसाळ्यात लिंबू आणि मध खाण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. लिंबू आणि मध योग्य पद्धतीने सेवन केल्यास पावसाळ्यातही वजन झपाट्यानं कमी करता येणं शक्य आहे. 

अधिक वाचा-  रजनीकांतच्या माजी जावयाने कहरच केला राव, सासऱ्याचाही रेकॉर्ड मोडतोय पठ्ठ्या!

लिंबू आणि मधाचा काढा

बऱ्याच लोकांना पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू आणि मध हा उपाय खूप फायदेशीर आहे. या समस्येसोबत वजन कमी करण्यासाठी पावसाळ्यात लिंबू आणि मधाचा एक काढा प्यायला जाऊ शकतो, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

लिंबू आणि मधाचा काढा कसा बनवायचा आणि प्यायचा

लिंबू आणि मधाचा काढा बनवण्यासाठी एका भांड्यात 2 ग्लास पाणी उकळा. आता त्यात एक चमचा आल्याची पेस्ट घाला आणि काही वेळ उकळू द्या. 
पाण्याला अर्धी उकळी आल्यावर लिंबाचे तुकडे करून त्यात टाका. नंतर हे पाणी 2-3 मिनिटे उकळा. आता हे पाणी गॅसवरून काढून त्यात एक चमचा मध टाका. आता हा काढा गरम प्या.

याच्या सेवनाने जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असेल तर ती देखील दूर होईल, तसंच वजन कमी करण्यास मदत होईल.

(अस्वीकरण: या लेखातील टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी