स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी नियमित मॅमोग्राम चाचणी करणं गरजेचं

४० वर्षांवरील बहुसंख्य महिला नियमित मॅमोग्राममध्ये जात नाहीत ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यास विलंब होतो. मॅमोग्राममध्ये स्तनातील बदल आढळू शकतात जे शारीरिक लक्षणे विकसित होण्याआधी कॅन्सरमध्ये बदलले जाऊ शकतात.

Regular mammogram testing is needed to prevent breast cancer
स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी नियमित मॅमोग्राम चाचणी करणं गरजेचं 
थोडं पण कामाचं
  • स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी नियमित मॅमोग्राम चाचणी करणं गरजेचं
  • ४० वर्षांवरील बहुसंख्य महिला नियमित मॅमोग्राममध्ये जात नाहीत
  • वेळेवर मॅमोग्राफी आपल्याला स्तनांच्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते

४० वर्षांवरील बहुसंख्य महिला नियमित मॅमोग्राममध्ये जात नाहीत ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यास विलंब होतो. मॅमोग्राममध्ये स्तनातील बदल आढळू शकतात जे शारीरिक लक्षणे विकसित होण्याआधी कॅन्सरमध्ये बदलले जाऊ शकतात. प्रत्येक स्त्रीने वेळोवेळी मॅमोग्राम करणे अत्यावश्यक आहे. स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये दिसणाऱ्या सामान्य कर्करोगापैकी एक आहे. जेव्हा काही स्तन पेशी असामान्य वाढू लागतात तेव्हा कर्करोग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. या प्रकारच्या कर्करोगामुळे सर्वाधिक प्रमाणात मृत्यू होतात. स्तनाच्या कर्करोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी वेळोवेळी तपासणी व निदान हे एक महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील महिलांनी मॅमोग्राफीचा पर्याय निवडला पाहिजे. Regular mammogram testing is needed to prevent breast cancer

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गिरीजा वाघ म्हणाल्या की, स्तनाचा कर्करोग असलेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना जागरुकतेच्या अभावामुळे आजाराचे निदान शेवटच्या टप्प्यात झाल्याचे दिसून आले. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास तो बरा होण्याची शक्यता वाढते. स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे हे उपलब्ध उपचार पर्यायांच्या विस्तृत श्रेणीशी संबंधित आहे, ज्यामुळे मृत्यूदर कमी होतो. तसेच, जीवनाची गुणवत्ता सुधारते. स्तनाच्या कर्करोगामुळे वाढती मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी स्कॅनिंग मॅमोग्राफी ही एक महत्त्वाची व वेळीच निदान करण्याची पद्धत आहे. मॅमोग्राम डक्टल कार्सिनोमा इन सीटू (डीसीआयएस), स्तनाच्या नलिकाच्या अस्तरातील असामान्य पेशी शोधण्यास मदत करते, जे भविष्यात आक्रमक कर्करोगात विकसित होऊ शकतात. ज्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग, लठ्ठपणा, अल्कोहोल किंवा धूम्रपान, कौटुंबिक आजाराचा संदर्भ आहे अशा स्त्रियांनी चाळीशीनंतर वेळेवर मॅमोग्राम करणे आवश्यक आहे.

डॉ. वाघ पुढे म्हणाल्या की, शहरी जीवनशैली, योग्य आहाराचा अभाव, शारीरिक हालचाली, लठ्ठपणा आणि पर्यावरणीय घटक यास कारणीभूत ठरत आहेत. स्तनाची स्व-तपासणी आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला हा वेळीच कर्करोगाचे निदान करण्यास मदत करते. जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे.

पॅथॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती कोटला म्हणाले की, स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी वेळोवेळी स्क्रीनिंग अत्यावश्यक आहे. वेळेवर मॅमोग्राफी आपल्याला स्तनांच्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते तसेच वेळीच निदान झाल्याने स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी करते आणि केमोथेरपीशिवाय उपचार करणे शक्य होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी