White Hair On Face: चेहऱ्यावर अचानक पांढरे केस येत असतील घाबरून न जाता 'हे' उपाय करा

तब्येत पाणी
Updated Jul 31, 2022 | 19:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

White Facial Hair: स्त्रीयांना तसेही चेहऱ्यावरचे केस आवडत नाहीत, पण चेहऱ्यावर पांढरे केस आले तर तणाव अनेक पटींनी वाढतो. हे केस काढण्याचे अनेक उपाय आहेत. ते वापरा आणि चेहऱ्यावरील पांढरे केस काढा.

 Remove white hair on face with the help of this techniques
चेहऱ्यावरील पांढरे केस या पद्धतींनी काढा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चेहऱ्यावरील पांढरे केस या उपायांनी काढा
  • मध, फेशिअल रेजर, लेजर हेअर रिमूव्हल ट्रिटमेंटचा वापर करा
  • हार्मोनल बदल, टेन्शन हे यामागचे कारण असू शकते

White Facial Hair Removing Tips: लहान वयातच डोक्यावर पांढरे केस येण्यास सुरुवात झाली तर ते टेन्शनचे कारण बनते, परंतु महिलांच्या चेहऱ्यावर पांढरे केस येण्यास सुरुवात झाली की तणाव वाढतो. मेलॅनिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्याचे केस पांढरे होतात. शरीरातील हार्मोनल बदल (Harmonal changes ) हे देखील यामागे मोठे कारण असू शकते. अशा स्थितीत अनेक महिला डिप्रेशनमध्ये जातात, पण तणाव घेण्याऐवजी काही सोपे उपाय करा. ( Remove white hair on face with the help of this techniques )


चेहऱ्यावरील पांढरे केस काढण्याचे प्रभावी उपाय

1 मध - 

मध त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो, तुम्ही त्यात साखर मिसळा आणि नंतर ते गरम केल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले पांढरे केस दूर करू शकता.


2. फेश‍ियल रेजर 

महिलांसाठी बाजारात अनेक प्रकारचे फेशियल रेझर (Facial Razor)उपलब्ध आहेत, ज्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले पांढरे केस दूर होऊ शकतात. यासाठी सर्वप्रथम चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. चेहरा कोरडा होणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा रॅशेस येऊ शकतात किंवा त्वचा सोलवटू शकते.

अधिक वाचा : ..म्हणून राऊतांवर ईडीची कारवाई, काँग्रेसने उपस्थित केले सवाल


3. अँप्लिकेटर

अॅप्लिकेटरच्या  (Applicator)  मदतीने चेहऱ्यावरील पांढरे केस काढून टाकता येतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत तुम्हाला वेदनाही होणार नाहीत.


4. लेजर हेयर र‍िमूव्हल

चेहऱ्यावरील पांढरे केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल तंत्र  (Laser Hair Removal Technique) खूप प्रभावी आहे, पण हे काम एखाद्या चांगल्या प्रोफेशनल पार्लर किंवा तज्ज्ञाकडूनच करावे, 
अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा.

अधिक वाचा : लादेनच्या भावाकडून प्रिन्स चार्ल्सनं घेतले होते 10 कोटी

5. थ्रेड‍िंग

थ्रेडिंग हा एक सोपा उपाय आहे जे पार्लरमध्ये करतात.  त्याच्या मदतीने पांढरे केस काढून टाकणे सोपे आहे. यामध्ये धाग्याच्या मदतीने केस काढले जातात.

( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी