Ringworm: गजकर्णामुळे चारचौघात बसणं-उठणं अवघड झालंय का? या टीप्सने दूर Fungal Infection टेन्शन

गजकर्ण,नायटा, खरुज हे एक त्रास देणारं आजार आहे. याला इंग्रजीत रिंगवर्म (Ringworm) म्हटलं जातं. दरम्यान हा इतका गंभीर त्वचारोग (Dermatitis) नाहीये, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा त्वचारोग वाढला असून  या त्वचारोगाने अनेकजण पीडित झाले आहेत. मुळात आजार बुरशीमुळे (fungus) होत असतो.

Ringworm: Is it difficult to sit and get up due to ringworm?
गजकर्णामुळे चारचौघात बसणं-उठणं अवघड झालंय का? मग हे उपाय करा  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला अगदी सहजपणे होतो.
  • आपल्या त्वचेच्या कोणत्याही भागात येऊ शकतात.
  • गजकर्ण हे मुले आणि प्रौढ अशा दोघांमध्ये दिसणारे एक सामान्य त्वचा संक्रमण आहे.

Fungal Infection Treatment:  गजकर्ण,नायटा, खरुज हे एक त्रास देणारं आजार आहे. याला इंग्रजीत रिंगवर्म (Ringworm) म्हटलं जातं. दरम्यान हा इतका गंभीर त्वचारोग (Dermatitis) नाहीये, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा त्वचारोग वाढला असून  या त्वचारोगाने अनेकजण पीडित झाले आहेत. मुळात आजार बुरशीमुळे (fungus) होत असतो. यामुळे अंगात घातलेल्या कपड्यामुळे दमटपणा, ओलसर कपडे परिधान करणं हे बुरशीला निमंत्रण देणारं असतं, दरम्यान गजकर्ण बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल किंवा इतर वस्तू वापरल्यामुळे हा आजार एकाकडून दुसऱ्या होत असतो.

आपल्या त्वचेच्या कोणत्याही भागात येऊ शकतात. रिंगवर्म ज्या भागावार झाला आहे त्या भागात खूप खाज सुटते. गजकर्ण हे मुले आणि प्रौढ अशा दोघांमध्ये दिसणारे एक सामान्य त्वचा संक्रमण आहे. डर्मटोफाइट नावाच्या बुरशीमुळे गजकर्ण त्वचारोग होत असतो. दरम्यान वैद्यकीय भाषेत या अवस्थेला टिनिआ म्हणतात. गजकर्ण वा नायट्याचा विकार कुणालाही होऊ शकतो. पण ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे, अशा व्यक्तींना याचा धोका सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत लहान मुलांनाही गजकर्ण होण्याची शक्यता असते.

Read Also : Janmashtami 2022: जन्माष्टमीला बनतोय 'हा' शुभ संयोग

रिंगवर्म वा गजकर्णाच्या लक्षणांमध्ये त्वचेवर लाल, पापुद्रीसारखे आणि गोल आकाराचे पॅच होत असतात. या खुणा नखांवरही होऊ शकतात. गजकर्ण नेहमी स्कॅल्प आणि हातांना प्रभावित करत असते, पण हे त्वचेच्या कोणत्याही भागावर होऊ शकते. हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला अगदी सहजपणे होतो. गजकर्ण बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल किंवा इतर वस्तू वापरल्यामुळे हा आजार होत असतो. 

Read Also : विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदेंचं नाव आघाडीवर

या समस्यांवर मात करण्यासाठी  बाजारात अनेक औषधे आणि स्किन क्रीम्स उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशाच अनेक नैसर्गिक टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही दादापासून सहज सुटका मिळवू शकता, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्व साहित्य तुम्हाला घरीच मिळेल. दरम्यान, गजकर्ण शरीराच्या इतर भागांवर पसरू नये यासाठी त्वचेला जितके शक्य असेल तितके स्वच्छ राखणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी इंफेक्शन असलेल्या जागेला दिवसातून एकदा किंवा दोनदा साबणाच्या पाण्याने धुतले पाहिजे. धुवून घेतल्यानंतर त्वचेला चांगल्या प्रकारे कोरडे होऊ देणेही खूप गरजेचे आहे. गजकर्णाची बुरशी ही शरीराच्या आर्द्रता असलेल्या भागातच जिवंत राहत असते. कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

1. सफरचंद व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे नायटा किंवा गजकर्णविरोधात शत्रूसारखे कार्य करतात आणि सफरचंद सायडर व्हिनेगरच्या मदतीने कॅन्डिडा बुरशीजन्य संसर्गावर देखील उपचार केले जाऊ शकतात. यासाठी व्हिनेगरमध्ये कापसाचा तुकडा भिजवून प्रभावित भागावर लावा. साधारण ३ दिवसात तुमचे गजकर्ण गायब होण्यास सुरुवात होईल.

2. कोरफड (Aloe Vera)

कोरफडीच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात हे आपण सर्वांना माहिती आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की फंगल इन्फेक्शनपासूनही सुटका मिळू शकते.  यासाठी कोरफडीच्या मोपची साल काढून त्याचा लगदा संसर्ग झालेल्या ठिकाणी लावा, असे दिवसातून ४ ते ५ वेळा केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसून येईल.

3. लसूण पेस्ट (Garlic Paste)

गजकर्णाची खाज खूप वेदनादायक असते, परंतु लसणाच्या वापराने आपण बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त होऊ शकता. यासाठी प्रथम लसणाच्या कळ्या वेगळ्या करून या मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यात खोबरेल तेलाचे थेंब टाकून पेस्ट तयार करा आणि प्रभावित भागात लावा आणि सुमारे एक ते 2 तास राहू द्या. असे केल्याने नायटाचा नायनाट होईल. 

4. नारळाचे तेल (Coconut Oil)

नारळाच्या तेलामध्ये आढळणारे काही फॅटी ॲसिड्स बुरशीच्या पेशींना नष्ट करत असतात. नारळाच्या तेलातील हे फॅटी ॲसिड्स बुरशीच्या पेशींच्या केंद्रकाला क्षतिग्रस्त करत असतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. या अंमल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. टाइम्स नाउ  याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी