Gulab Jal Benefits: डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या समस्येपासून देऊ शकते सुटका

तब्येत पाणी
Updated Jan 30, 2021 | 11:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gulab Jal Benefits: गुलाबजल आपले सौंदर्य वाढवण्यातच नाही तर आरोग्याबाबतच्या आपल्या अनेक समस्या दूर करण्यातही फायदेशीर असतो. यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळून येतात.

Rose water benefits
डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या समस्येपासून देऊ शकते सुटका, जाणून घ्या गुलाबजलाचे फायदे 

थोडं पण कामाचं

  • हृदय, मस्तिष्क त्वचेसंबंधीच्या समस्या दूर करण्यास मदत करते गुलाबजल
  • ऋतूप्रमाणे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी करा गुलाबजलाचे सेवन
  • पोटदुखी, गॅस यासारख्या समस्यांपासून मुक्ती देण्यात मदत करते गुलाबजल

Gulab Jal Health Benefits: गुलाबजल (Rose water) आपले सौंदर्य (beauty) वाढवण्यातच नाही तर आरोग्याबाबतच्या (health) आपल्या अनेक समस्या (problems) दूर करण्यातही फायदेशीर असतो. यात अनेक प्रकारचे औषधी गुण (medicinal qualities) आढळून येतात. हृदय (heart), मस्तिष्क (brain) त्वचेसंबंधीच्या समस्या (skin problems) दूर करण्यास गुलाबजल मदत करते. प्राचीन काळी राण्यामहाराण्या या गुलाबजलाचा वापर आंघोळीसाठी करत. त्यामुळे त्वचेचे आजार दूर राहात आणि त्यांची त्वचा तजेलदार राहात असे. जाणून घेऊया गुलाबजलाचे आरोग्यासंबंधीचे फायदे.

एक्झिमा

गुलाबजल हे एक्झिमापासून सुटका करण्यासाठी रामबाण उपाय आहे. एक्झिमाला डर्माटायटिस असेही म्हटले जाते. यात त्वचेवर लाल रंगाचे डाग येतात आणि खाज सुटते. जर यावर योग्य वेळी उपचार झाले नाहीत तर हे गंभीर होऊ शकते. यासाठी औषधासह नियमितपणे गुलाबजल लावल्यास यातील अँटीऑक्सिडंट गुण आपल्याला यापासून सुटका करण्यात मदत करतात.

घशातली खवखव करा दूर

बदलत्या हवामानामुळे अनेकदा आपल्याला छोटेमोठे त्रास होतात. यात सर्दी, पडसे आणि घशात खवखव होऊ शकते. आपल्या नियमित औषधांच्या सोबत गुलाबजलाचे सेवन केल्याने आपल्याला घशातील खवखवीपासून आराम पडेल आणि अशाच इतर समस्याही कमी होतील.

डोकेदुखीपासून मिळवा आराम

गुलाबजल हे डोकेदुखीपासून आराम देण्यातही सहाय्य करते. जर खूप उन्हातून आल्यावर आपले डोके दुखत आहे तर रुमाल गुलाबजलात बुडवून डोक्यावर ठेवा. यामुळे थोड्याच वेळात आपली डोकेदुखी गायब होईल.

पचनक्रिया ठेवते तंदुरुस्त

पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासोबतच गुलाबजल गॅससारख्या पोटाच्या समस्यांवरही काम करते. त्यामुळे नियमितपणे थोडे गुलाबजल घेतल्याने बरेच फायदे होतात.

डोळ्यांच्या उपचारातही मदत करते

गुलाबजलात शक्तिशाली अँडीऑक्सिडंट असतात जे संसर्ग थांबवण्यात सहाय्य करतात. याचा वापर नैसर्गिक आणि वैद्यकीय उपचारांमध्ये केला जातो. जर आपले डोळे सारखे लाल होत असतील तर गुलाबजलाचे सेवन करा. नियमितपणे डोळ्यात गुलाबजलाचे एकदोन थेंबही टाका. यामुळे डोळ्यात होणाऱ्या कंजंक्वयटिसच्या (डोळे येणे) इलाजातही मदत होते.

डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या समस्येपासून देऊ शकते सुटका

गुलाबजल हे ताण आणि तणावाच्या समस्यांसोबतच डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या समस्येवरच्या इलाजातही मदत करते. यासाठी नियमितपणे गुलाबजल घ्या. यामुळे आपला मूड फ्रेश राहतो आणि झोपही चांगली लागते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी