Run for Fitness : वजन कमी करण्यासाठी रोज फक्त ‘एवढंच’ अंतर धावा, अनेक आजार होतील दूर

धावण्यामुळे शरीरातील अनावश्यक कॅलरीज वेगाने जळायला मदत होते आणि फिटनेस दीर्घकाळ राखता येतो.

Run for Fitness
वजन कमी करण्यासाठी रोज फक्त ‘एवढंच’ अंतर धावा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चालण्यापेक्षा धावण्यामुळे वजन होतं कमी
  • धावण्यामुळे कमी वेळात जळतात अधिक कॅलरीज
  • अनेक आजार राहतात दूर

Run for Fitness : वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. कुणी जिममध्ये जाऊन जोरदार व्यायाम (Gym Exercise) करतं, तर कुणी जवळपासच्या बागेत जाऊन चालण्याचा (Walk in garden) व्यायाम करतं. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार व्यायामाची पद्धत निवडतात आणि त्याद्वारे आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. यापैकी धावणे (Running) हा एक उत्तम व्यायाम असल्याचं सांगितलं जातं. धावण्यामुळे वजन कमी व्हायला मदत तर होतेच, त्याशिवाय अनेक आजारांपासून शरीराला वाचवता येऊ शकतं आणि सुरक्षित ठेवता येतं. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर अनेकजण आपल्याला रनिंग करताना दिसतात. रोज काही किलोमीटर धावल्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आणि बऱ्याच विकारांपासून दूर राहायला आपल्याला मदत होत असते. रोज रनिंग करणे हा वजन कमी करण्याचा सर्वात जलद उपाय समजला जातो. अनेकांना हे जाणून घेण्यात रस असतो की वजन कमी करण्यासाठी रोज किती अंतर धावावं लागेल. जाणून घेऊया धावण्यामुळे किती कॅलरीज बर्न होतात आणि त्याचा शरीराला किती फायदा होऊ शकतो, याविषयी. 

रनिंगमुळे जळतात कॅलरीज

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार धावण्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅलरीज जाळल्या जातात. इतर कुठल्याही व्यायामापेक्षा वजन कमी करण्यासाठी धावण्याचा व्यायाम सर्वोत्तम मानला जातो. धावताना आपल्या शरीरातील बहुतांश स्नायू त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत असतात. एका अभ्यासानुसार 1600 मीटर धावल्यानंतर तेवढंच अंतर चालण्याच्या तुलनेत 35 कॅलरीज अधिक जाळल्या जातात. जर तुम्ही दररोज 8 ते 10 किलोमीटर धावलात, तर तेवढंच अंतर चालण्याच्या तुलनेत जवळपास 350 कॅलरीज अधिक जाळता. हार्वर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार जर तुम्ही 10 किलोमीटर प्रतितास या वेगाने 30 मिनिटं धावलात, तर जवळपास 372 कॅलरीज बर्न होऊ शकतात. दररोज जर हा व्यायाम तुम्ही करत असाल, तर वेगाने तुमचं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. 

अधिक वाचा - Sweat in Body : घाम येणं कधी चांगलं? कधी वाईट? वाचा सविस्तर

पोटाची चरबीही होईल कमी

पोटावर वाढत जाणारी चरबी ही आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे हृदयरोग, टाईप-2 डायबेटिक्ससह अनेक आजारांना आमंत्रण मिळत असतं. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हाय-ॲरेबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नियमितपणे धावण्याचा व्यायाम सुरू केलात, तर तुमच्या डाएटमध्ये कुठलाही बदल न करतानाही तुमचं वजन वेगाने कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र वेगाने वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेगाने धावणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणं सायकलिंगमुळेही पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा - Weight Loss: स्विमिंग करून करा वजन कमी, एका तासात होत्यात एवढ्या कॅलरी बर्न

डिस्क्लेमर - धावण्यामुळे होणारे हे सामान्य फायदे आहेत. धावायला सुरुवात केल्यानंतर अनेकांना गुडघ्याचे किंवा इतर काही त्रास सुरु होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही नवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या फिटनेस कोचचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी