मुंबई: आयुर्वेद अनेक हर्बल उपचारांचा खजिना आहे. असं म्हटलं जात की प्राचीन चिकित्सा विज्ञानात हर्बल उपचार आणि औषधांचा समावेश आहे. यामुळे विविध आजार बरे होण्यास मदत होते. आयुर्वेदात अशा काही औषधांचा समावेश करण्यात आला आहे जी ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात.
आयुर्वेदानुसार डायबिटीज एक मेटाबॉलिक कफ प्रकारातील विकार आहे ज्यात पाचन अग्नि कमी होऊ लागतो आणि ब्लड शुगर वाडू लागते. ब्लड शुगरमध्ये स्पाईक्सला नियंत्रित कऱण्यासाठी आयुर्वेदात सदाफुलीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सदाफुलीचा वापर डायबिटीजमध्ये होतो. याच्या वापराने डायबिटीज बरा होण्यास मदत होते.
सदाफुली भारतात सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळणारे फुलाचे झाड आहे. हे झाड सजावटीसाठी असते. तसेच यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. या फुलांच्या पाकळ्या चमकदार, गहऱ्या रंगाच्या असतात. हे फुल टाईप २ डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. सकाळी फुले आणि पानांपासून बनवलेली हर्बल चहा डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरते.
सदाफूल हे अनेक वर्षांपासून आयुर्वेद आणि चीनच्या औषधांमध्ये वापरले जात आहे. यात डायबिटीज, मलेरिया, गळ्यात खवखव तसेच ल्युकेमियासारखे आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. या आजारांवर हे गुणकारी औषध आहे.
दरम्यान, आम्ही जे सांगितलेले उपाय करून पाहण्याआधी आपल्या डॉक्टरांचा अथवा आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या