स्किझोफ्रेनियावरील औषधाच्या संशोधनासाठी “डॉ. वैशाली लोंढे” यांना पेटंट

 स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. या गंभीर आजारामध्ये मौखिक औषधांना म्हणजेच गोळ्यांना पर्यायी उपचार पद्धती लवकरच उपलब्ध होणार आहे.

SchizophreniaVarial Pharmacology Modificationsathi “Dr. Vaishali Londhe
स्किझोफ्रेनिया औषधाच्या संशोधनासाठी डॉ. लोंढे यांना पेटंट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • SVKM NMIMS’ SPPSPTM येथे पीजी प्रोग्राम चेअर पर्सन.
  • मौखिक औषधे म्हणजे गोळ्यांना पर्यायी उपचार प्रणाली.
  • इलोपेरिडोन मायक्रोनिडल्सचा वापराने उपचार करण्यावर भर.

मुंबई :  स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. या गंभीर आजारामध्ये मौखिक औषधांना म्हणजेच गोळ्यांना पर्यायी उपचार पद्धती लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यासंदर्भातील पेटंट मिळविण्यात SVKM NMIMS’ SPPSPTM डॉ. वैशाली लोंढे यांना यश आले आहे. सद्यस्थितीमध्ये इलोपेरिडॉनहे औषध फक्त गोळ्यांच्या माध्यमातूनच पेशंटला देण्यात येत आहे. मात्र, या संशोधनानंतर आता हायड्रोफोलिक मायक्रो निडल्सच्या सहाय्याने स्किझोफ्रेनिया या आजारामध्ये औषध देता येऊ शकेल. यामुळे इलोपेरिडॉनया औषधाची परिणामकारकता वाढणार आहे. SERB रिसर्च ग्रान्ट (CRG/2018/0031176) या अंतर्गत इलोपेरिडॉनया अँटिसायकोटीक औषधाबाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी हा विषय मांडण्यात आला.

डॉ. वौशाली लोंढे यांना वर्धित औषध लोडिंग आणि वितरण प्रणालीसह मायक्रो निडल्स फॅब्रिकेशनचे पेटंट मिळाले आहे. एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस शोभाबेन पटेल स्कूल ऑफ फार्मसी आणि टेक्नाँलॉजी मॅनेजमेंट (SPPSPTM) येथे त्या पीजी प्रोग्राम चेअर पर्सन आहेत. त्यांना नुकतेच इंडियन पेटंट नं. 411078 प्रदान करण्यात आले आहे. त्यांनी वर्धित औषध लोडिंग आणि वितरण प्रणालीसह मायक्रो निडल्स फॅब्रिकेशन या विषयावर यशस्वी संशोधन केले आहे.

नवीन संशोधन हे मौखिक औषधांना एक चांगला पर्याय ठरणार आहे. काही संशोधनांनंतर ते उपलब्ध होऊ शकेल. स्किझोफ्रेनिया हा एक जुनाट आणि गंभीर मानसिक आजार आहे. इलोपेरिडोन मायक्रोनिडल्सचा नवीन शोध आजाराने त्रस्त रूग्णांसाठी एक नवी आशा ठरणार आहे.- डॉ. वैशाली लोंढे, पीजी प्रोग्राम चेअरपर्सन एम. फार्मा, पीएचडी.

एसपीपीएसपीटीएम चे डीन डॉ. बाळा प्रभाकर यांनी डॉ. वैशाली लोंढे यांचे कौतुक करताना; जागतिक आरोग्य सेवेसाठी आणखी परिणामकारक काम करण्यासाठी आम्हाला अशा संशोधनांमधून प्रेरणा मिळते असे ते म्हणाले. तसेच आम्ही संशोधनावर आणखी भर देऊ आणि संशोधनात मोठी प्रगती करू, एसपीपीएसपीटीएमने नेहमीच नवनवीन संशोधनांवर भर दिला आहे. या संशोधनामुळे जागतिक आरोग्य सेवेवर आणखी परिणामकारक काम करण्याची संधी मिळाली आहे.- डॉ. बाळा प्रभाकर, डीन एसपीपीएसपीटीएम.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी