शास्त्रज्ञांचा दावा- आल्याच्या नियमित सेवनाने घटते वजन, असा करा प्रयोग

तब्येत पाणी
Updated Jun 23, 2021 | 17:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ginger for weight loss: आल्याच्या नियमित सेवनाने आपली पाचनशक्ती तंदुरुस्त राहते. तसेच मायग्रेनचाही त्रास कमी होतो. 

ginger
शास्त्रज्ञांचा दावा- आल्याच्या नियमित सेवनाने घटते वजन 

थोडं पण कामाचं

  • जर तुम्ही आले आणि लिंबूचे सेवन एकत्र करता तर वजन घटवण्यासोबतच तुमच्या संपूर्ण शरीराला याचे फायदे होतात.
  • अॅपल सायडर व्हिनेगारमध्येही वजन घटवण्याचे गुण असतात
  • वेट लॉससाठी तुम्ही आपल्या घरी आल्याचे सेवन करू शकता

मुंबई: आल्याचा वापर चहापासून ते विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये तसेच अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. आले सूज कमी करते, पाचनतंत्र योग्य राखते आणि इम्युनिटी बूस्ट करण्याचे काम करते. मात्र तुम्हाला माहीत आहे की आल्यामध्ये अशे काही गुण असतात जे भूक नियंत्रित करण्याचे काम करतात आणि तसेच यामुळे वजन घटवणेही फायदेशीर ठरते. आरोग्य तज्ञांचा दावा आहे की आल्याच्या सेवनाने वजन घटवण्यास मदत मिळते. येथे आम्ही तुम्हाला वजन घटवण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. 

वेट लॉससाठी घ्या जिंजर-लेमन ड्रिंक

जर तुम्ही आले आणि लिंबूचे सेवन एकत्र करता तर वजन घटवण्यासोबतच तुमच्या संपूर्ण शरीराला याचे फायदे होतात. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते ज्यामुळे भूक नियंत्रित राहते तसेच यामुळे अतिरिक्त कॅलरीजचे प्रमाणही कमी होतो. तुम्ही  जिंजर टी अथवा जिंजर ड्रिंकमध्ये लिंबूचे काही थेंब मिसळून पिऊ शकता. दिवसांतून एक ते दोन वेळा हे ड्रिंक प्यायल्याने वेगाने वेट लॉस होण्यास मदत होते. 

अॅपल सायडर व्हिनेगार आणि आले

अॅपल सायडर व्हिनेगारमध्येही वजन घटवण्याचे गुण असतात. आल्यासोबत याचा वापर केल्याने अनेक फायदे मिळतात. वेट लॉससाठी हे दोन्ही तुम्ही तुमच्या आहारात सामील करू शकता. यासाठी गरम पाण्यात एक टी बॅग टाकून आल्याचा चहा तयार करा. हा चहा थंड झाल्यावर यात अॅपल सायडर व्हिनेगार टाका. ॉ

आले-मध ज्यूसनेही घटते वजन

वेट लॉससाठी तुम्ही आपल्या घरी आल्याचे सेवन करू शकता. यात तुम्ही लिंबू, मधाचाही वापर करू शकता. हे बनवण्यासाठी एक कप पाणी लागेल. यात आल्यासह लिंबू, मध मिसळा. हे ड्रिंक तुम्ही दिवसातून दोन वेळा पिऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी