Healthy Life Style : आपल्या देशात लोकांना अगदी तरुण वयात हृदयविकाराचा झटका आणि हृदयासंबंधीत आजारांचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी, जपानमधील सुमारे 27 टक्के लोकसंख्या ही 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. जपानमध्ये 50 हजारांहून अधिक लोकं आहेत जी 100 वर्षांहून जास्त वयाची आहेत. जपानी लोकांना इतके दीर्घ आयुष्य कसे काय लाभते, असा प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविकच आहे! या देशातील बहुतांश लोक वृद्धापकाळातही आनंदी आणि पूर्ण तंदुरुस्त जीवन जगतात. आपण इथे जाणून घेऊ, की त्यांच्या या निरोगी आरोग्याचे आणि आनंदाचे नेमके काय रहस्य आहे? (secret behind the good health of Japanese people who live to be 100 years old)
अधिक वाचा : कालाष्टमीला काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही आरती
जपानी लोक त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत फार चोखंदळ असतात. त्यांच्या दैनंदिन अन्नामध्ये इतर लोकांच्या तुलनेत सुमारे 25 टक्के कमी कॅलरीज असतात. पौष्टिकतेच्या बाबतीत, ते कधीही तडजोड करत नाहीत आणि नेहमी निरोगी पोषक आहार घेतात. त्यांच्या या दैनंदिन आहारामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते.
मासे हा जपानी लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच जपानी लोक चहा पितात, पण तो चहा भारतीयांचा दूध आणि साखरेचा चहा नसून ग्रीन टी असतो. ग्रीन टी मुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो. जी लोकं एका दिवसात 4-5 कप ग्रीन टी पितात त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 26 टक्क्यांनी कमी होते. यासोबतच ग्रीन टी मुळे आपली चयापचय प्रक्रियेत सुधारते. त्यामुळे पचन आणि वाढत्या वजनाची समस्या कमी होते.
अधिक वाचा : मध्य रेल्वे मार्गावर आजपासून तीन दिवसांचा मेगा जंबो ब्लॉक
जपानी लोकांच्या उत्तम आरोग्याचे आणि दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे हिरव्या पालेभाज्या आणि वनस्पतीद्वारे बनवलेला आहार. जपानी लोकं मांसाहार फार कमी प्रमाणात करतात. तिथे भात अधिक खातात. जपानी एका जेवणात चार प्रकारच्या भाज्यांचा समावेश करून अन्न खातात. डुकराचे मांस खास प्रसंगालाच खायला त्यांना आवडते.
जपानी लोकांचे दीर्घायुष्य आणि आनंदी राहण्याचे एक कारण म्हणजे तिकडचे सामाजिक मूल्य देखील आहे. या लोकांना नेहमी एकमेकांना मदत करणे आणि एकत्र राहणे आवडते. केवळ मनुष्यच नाही तर ते वनस्पती आणि प्राण्यांचीही काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. जुन्या गोष्टी लक्षात न ठेवता पुढे जाण्यावर त्यांचा नेहमी विश्वास असतो.
अधिक वाचा : बीड:बाजार समिती निवडणुकीवरून क्षीरसागर काका पुतणे आमने-सामने
जपानी लोक त्यांच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरूक असतात. जास्तवेळ चालणे आणि झाडांची लागवड करणे हा त्यांच्या दैनंदिन सवयींमधला एक भाग आहे. यामुळे ते निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतात. जपानी लोकांच्या घरांमध्ये खुर्ची तसेच टेबल यांसारखे फर्निचर फारच दुर्मिळ पाहायला मिळेल. त्यांना जमिनीवर बसून जेवायला आवडते. जमिनीवर उठ-बस केल्यामुळे त्यांचे शरीर अगदी तंदुरुस्त राहते.