सात उपाय करा आणि पावसाळी आजारांपासून सुरक्षित राहा

seven tips for good physical health during rainy season अनुभवी डॉक्टरांनी सुचवलेले सात उपाय केले तरी पावसाळी आजारांपासून स्वतःचे रक्षण करणे शक्य होईल.

seven tips for good physical health during rainy season
सात उपाय करा आणि पावसाळी आजारांपासून सुरक्षित राहा 

थोडं पण कामाचं

  • सात उपाय करा आणि पावसाळी आजारांपासून सुरक्षित राहा
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा
  • पालेभाज्या, ब्रोकोली, गाजर, हळद, आले, लसूण, सुंठ यांचे सेवन करा

ऋतू बदलला, पावसाळा आला की त्याच्यासोबत आजारपणंही येतं. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने दूषित पाणी, दूषित अन्न, संसर्ग या कारणांमुळे रुग्णांची संख्या वाढते. अतिसार (डायरिया/जुलाब), गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर, कॉलरा, वातविकार, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया, सर्दी-खोकला, ताप, त्वचाविकार, फंगल इन्फेक्शन अशा स्वरुपाच्या आजारांनी त्रस्त रुग्ण डॉक्टरांकडे रांगा लावतात. यातच आता कोरोनासोबत पावसाळी आजाराची लागण झाली तर जीवाला गंभीर धोका होईल, अशी चिंता डॉक्टरांना सतावत आहे. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासह आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनुभवी डॉक्टरांनी सुचवलेले सात उपाय केले तरी पावसाळी आजारांपासून स्वतःचे रक्षण (seven tips for good physical health during rainy season) करणे शक्य होईल.

१. दूषित पाणी पिणे टाळा

पावसाळ्याच्या दिवसांत जमिनीवरील कचरा, धूळ, माती थेट पाण्यात मिसळण्याचा धोका असतो. दूषित पाणी पोटात गेल्यामुळे पोटाचे विकार, उलट्या, अतिसार, कावीळ असे गंभीर आजार होऊ शकतात. हा धोका टाळण्यासाठी पावसाळ्यात उकळून थंड केल्यानंतर गाळून घेतलेले शुद्ध पाणी वापरा. हे पाणी पिण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी उत्तम असते. दिवसभरात ६ ते ८ ग्लास पाणी प्या. उकळून थंड करण्याच्या प्रक्रियेत पाण्यातील अनेक घातक बॅक्टेरिया नष्ट होतात.

२. उघड्यावरील दूषित अन्न खाणे टाळा

पावसाळ्याच्या दिवसांत माणसाची पचनशक्ती मंदावते. या दिवसांत उघड्यावरचे पदार्थ, तेलकट-तुपकट पदार्थ, शिळे पदार्थ खाणे टाळा. उघड्यावरचे पदार्थ दूषित असण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत हे पदार्थ खाणे टाळा. घरचे ताजे सकस आणि पौष्टिक अन्न खा. शक्यतो पदार्थ गरम असतानाच खाऊन घ्यावेत. पचायला जड असणारे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खाणे टाळा. फास्ट फूड, जंक फूड खाणे टाळा.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा. जास्तीत जास्त पालेभाज्या खा. ब्रोकोली, गाजर,  हळद, आले, लसूण, सुंठ अशा पदार्थांचे सेवन  पावसाळ्यात आरोग्यासाठी लाभदायी आहे. हळद ही अँटीऑक्सिडंट आहे तर लसूण सर्दी-खोकल्यापासून रक्षण करते. श्वसनाचा त्रास असल्यास आल्याचे सेवन करा. डाळिंब, चेरी, आलुबुखार, पीच, लिची ही फळे पावसाळ्याच्या दिवसांत खावी.

४. जखम स्वच्छ ठेवा

पावसाळ्यात अनेकदा लहान-मोठ्या जखमा होतात. या जखमांवर वेळेत योग्य तो उपचार करा. जखम झाली अथवा कापले असेल तर ती जखम स्वच्छ करा. जखमेवर लगेच अँटीसेप्टिक मलम (क्रीम) लावा. पावसाळ्याच्या दिवसात जखमेतून जंतूसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. याच कारणामुळे जखमेच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका

५. डासांपासून स्वतःचे रक्षण करा

पावसाळ्यात घर, कामाचे ठिकाण आणि भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा. तसेच फुलदाण्या, झाडे स्वच्छ ठेवा.  यामुळे डासांचा धोका कमी होतो. परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. घरात फिशटँक असल्यास खबरदारी घ्या, नियमित त्याचे पाणी बदला. डास प्रतिबंधक जाळ्या, मच्छरदाणी, डास प्रतिबंधक औषधे, क्रीम वापरा. परिसरात औषध फवारणी करुन डासांना प्रतिबंध करा. डास जेवढे दूर असतील तेवढे डासांपासून होणारे आजार दूर राहण्याची शक्यता जास्त असेल.

६. पावळ्यात भिजू नका

पावसाळ्यात हवेतील गारव्यामुळे तसेच पुरेसे उन नसल्यामुळे वातावरणात बॅक्टेरिया आणि जंतू यांचा प्रार्दुभाव जास्त असतो. या वातावरणात लवकर आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पावसात भिजणे टाळा. पावसातून आल्यावर कोमट पाण्याने हात-पाय धुवा, शक्य असल्यास कोमट पाण्याने आंघोळ करा. शरीर आणि केस पुसून स्वच्छ, कोरडे करा. भिजलेल्या अवस्थेत दीर्घकाळ राहण्याने फंगल इन्फेक्शन, त्वचाविकार होण्याचा धोका जास्त असतो. 

७. नियमित व्यायाम करा

पावसाळ्यात बाहेर पडणे शक्य झाले नाही तर घरातल्या घरात पण किमान अर्धा तास व्यायाम करा. व्यायामामुळे आरोग्य चांगले राहते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी