Sexual Problems: असा होऊ शकतो लैंगिक आजार, 'ही' असतात लक्षणं

Sexual Problems: लैंगिक समस्या खूप धोकादायक ठरु शकतात, अशा परिस्थितीत काही लक्षणे दिसू लागताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. एका संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला लैंगिक संपर्काद्वारे संक्रमण सर्वाधिक होतं. जे आपण विशिष्ट लक्षणांद्वारे ओळखू शकतो.

sexual problems some symptoms can be seen in body it can be a sexually transmitted disease contact immediately doctor
Sexual Problems: असा होऊ शकतो लैंगिक आजार, 'ही' असतात लक्षणं  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रायव्हेट पार्टभोवती खाज सुटणे
  • लघवी करताना जळजळ आणि वेदना
  • मासिक पाळी नसतानाही रक्तस्त्राव होणं

Sexual Disease: लैंगिक समस्या (sexual problems) या आरोग्यासाठी (Health) अत्यंत घातक ठरू शकतात. अशा समस्या दूर करण्यासाठी, लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधावा. मात्र, अनेकवेळा लाज बाळगून लोक अशा समस्या सांगण्यास कचरतात, परंतु योग्य उपचार न केल्यास या समस्यांवर मात करणे खूप कठीण होऊन जातं. (sexual problems some symptoms can be seen in body it can be a sexually transmitted disease contact immediately doctor)

खरं तर लैंगिक संक्रमणाची अनेक कारणे असू शकतात, परंतु मुख्यतः ते लैंगिक संपर्काद्वारे एका संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात. जेव्हा या समस्या उद्भवतात तेव्हा अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. तर, आज आम्ही तुम्हाला लैंगिक समस्यांची नेमकी कोणती लक्षणं उद्भवतात त्याबाबत सांगणार आहोत-

प्रायव्हेट पार्टभोवती खाज सुटणे

जर तुम्हाला सतत प्रायव्हेट पार्टजवळ खाज येत असेल तर ते लैंगिक समस्येचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बराच काळ हा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधण्याची गरज आहे.

अधिक वाचा: Tea or Coffee: चहा किंवा कॉफी काय आहे आपल्यासाठी बेस्ट?

लघवी करताना वेदना

लघवी करताना तुम्हाला जळजळ किंवा वेदना होत असल्यास, हे लैंगिक संक्रमित संसर्गाचे लक्षण देखील असू शकते. या व्यतिरिक्त, जर तुम्हाला शारीरिक संबंधादरम्यान वेदना होत असतील तर हे देखील एक चिंताजनक लक्षण आहे.

प्रायव्हेट पार्टभोवती फोड येणं

काहीवेळा लैंगिक संक्रमणामध्ये प्रायव्हेट पार्टभोवती फोडही येतात. नंतर हे फोड स्कॅब्सच्या स्वरूपात गोठतात, ज्यामुळे खाज सुटू शकते. अशावेळी आपण तात्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अधिक वाचा: Newspaper: पोहे, जिलेबी, समोसा, वर्तमानपत्रात बांधून देण्यास बंदी, उल्लंघन केल्यास थेट तुरुंगवास

मासिक पाळी नसलेल्या स्त्रियांमध्ये रक्तस्त्राव

जर स्त्रियांना मासिक पाळी नसतानाही रक्तस्त्राव होत असेल तर हे लैंगिक संक्रमित संसर्ग असण्याचं लक्षण आहे. अशा स्थितीत डॉक्टरांशी कोणताही संकोच न करता संपर्क साधावा, अन्यथा समस्या हळूहळू लक्षणीयरीत्या वाढू शकते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर फार घातक परिणाम होऊ शकतो.

(टीप: या लेखात दिलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत. त्याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी