Shaking Legs:तुम्हाला बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय आहे का? तर आजच द्या सोडून नाहीतर...

तब्येत पाणी
Updated Dec 27, 2021 | 13:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shaking Legs Habit: याला रेस्टलेस सिंड्रोम नर्व्हस सिस्टीम आणि स्लीप डिसॉर्डरशीबी जोडले जाऊ शकतो. दरम्यान, पाय हलवण्याची अन्य कारणेही असू शकतात. 

legs
तुम्हाला बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय आहे का? तर... 
थोडं पण कामाचं
  • अनेक जण असे मानतात की पाय हलवल्याने कुटुंबाचा खर्च वाढतो.
  • ही सवय तुम्हाला गंभीर आजार देऊ शकते. 
  • काहींना जर पाय हलवण्याची सवय असल्यास त्यांच्या शरीरात आर्यनची कमतरता असते

मुंबई: अनेकदा तुम्ही आसपासच्या लोकांना पाहिले असेल की उंचावर जसे बेड, खुर्चीवर बसल्यास त्यांना पाय हलवण्याची(Leg shaking) सवय असते. अनेकजण तर बसलेले बोलत असताना जोरजोरात पाय हलवत असतात. तर काहींना बेडवर झोपलेले असतानाही पडल्या पडल्या पाय हलवण्याची सवय असते. तुम्ही म्हणाल यावर बोलण्यासारखे ते काय आहे? यामुळे काय नुकसान होणार?shaking leg habit may be dangereous to your health

घरातील मोठ्या व्यक्ती अशा सवयीमुळे ओरडतात. अनेकांना पाय हलवणे हे शुभ-अशुभाच्या गोष्टी वाटतात.अनेक जण असे मानतात की पाय हलवल्याने कुटुंबाचा खर्च वाढतो. अशाही काही मान्यता आहेत. मात्र ही सवय तुम्हाला गंभीर आजार देऊ शकते. 

आर्यनची कमतरता

पाय हलवणे ही अनेकांची समस्या असते. मुळे यासरळपणे काही नुकसान तर होत नाही मात्र ही सवय असणे म्हणजे शरीरात एखाद्या गोष्टीची कमतरता निर्माण होणे आहे. तज्ञांच्या मते काहींना जर पाय हलवण्याची सवय असल्यास त्यांच्या शरीरात आर्यनची कमतरता असते. अशावेळेस डॉक्टर चेकअप करण्याचा सल्ला दिला जातो. 

रेस्टलेस सिंड्रोम नर्व्हस सिस्टीम

यासंबंधातील रिपोर्ट्सनुसार १० टक्के लोकांना पाय हलवण्याची समस्या असते. ३५ पेक्षा जास्त वयांच्या व्यक्तींमध्ये ही समस्या कॉमन आहे. याला रेस्टलेस सिंड्रोम नर्व्हस सिस्टीमशीही जोडले जाऊ शकते. अशातच तज्ञांशी बोलण्याचा सल्ला दिला जातो. 

सतत पाय हलवावेसे का वाटतात?

पाय हलवल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात डोपामाईन हार्मोन निघते. त्यामुळे सतत पाय हलवावेसे वाटतात. या समस्येचा स्लीप डिसॉर्डरशीही संबंध असू शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते अनेकदा झोप पूर्ण न झाल्याने व्यक्तीला थकवा येतो यामुळे रक्त चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी