Health Care: तुम्हालाही सतत चहा पिण्याची सवय आहे का? अशी करा कमी

तब्येत पाणी
Updated Jun 08, 2022 | 17:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Care Tips:अनेक लोकांच्या दिवसाची सुरूवात चहाने होते. अशातच आम्ही तुम्हाला असे उपाय सांगतो जे वापरून तुम्ही सतत चहा पिण्याची सवय कमी करू शकता. 

tea
तुम्हालाही सतत चहा पिण्याची सवय आहे का? अशी करा कमी 
थोडं पण कामाचं
  • जास्त चहा प्यायल्याने तुम्हाला पोटासंबंधी समस्या सतावू शकतात.
  • अनेकांना चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने छातीत जळजळ, पोटात गॅस, आंबट ढेकर यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
  • चहा आपल्या पचनसंस्थेला हानी करतो. 

मुंबई: चहा(tea) हे भारतीय लोकांच्या आवडीचे पेय आहे. अनेकांच्या दिवसाची सुरूवातच चहाने होते. तर काही जणांना चहासोबत स्नॅक्स खाण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की सतत चहा पिण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. दिवसांतून दोन कप चहा पिणे ही वाईट सवय(bad habit) नाही मात्र त्यापेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नव्हे. अशातच तुम्ही ही सवय सोडून दिली पाहिजे. आम्ही आज तुम्हाला असे उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सतत चहा पिण्याची सवय सोडून द्याल. side effects of drinking more tea

अधिक वाचा - नुपूर शर्माच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

चहा पिण्याने होणारे नुकसान

पोटासाठी धोकादायक - जास्त चहा प्यायल्याने तुम्हाला पोटासंबंधी समस्या सतावू शकतात. यामुळे पाचनशक्ती खराब होते. चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने पोटात गॅस, ब्लॉटिंग आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. 

जळजळ होते - अनेकांना चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने छातीत जळजळ, पोटात गॅस, आंबट ढेकर यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. चहा आपल्या पचनसंस्थेला हानी करतो. 

चहा पिण्याची सवय कमी करण्यासाठी उपाय

  1. चहाचे अधिक सेवन कमी करण्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे तुम्हाला जेव्हा कधीही चहा पिण्याची इच्छा झाली तर त्याजागी काही तरी हेल्दी प्या. चहाच्या जागी ज्यूस प्या.
  2. चहा पिण्याची सवय कमी न केल्यास तुमच्या शरीरासाठी ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही चहा हळूहळू कमी करा. यासाठी दररोज एक एक कप कमी करत जा. 
  3. चहाचे सेवन कमी करण्यासाठी तुम्ही संपूर्ण दिवस तरल पदार्थांचे सेवन अधिक करा. यामुळे शरीरात एनर्जी राहील आणि तुम्हाला चहाचे क्रेव्हिंग कमी होईल. 
  4. झोपेशी कधीही तडजोड करू नका. जर तुम्ही योग्य आणि पुरेशी झोप घेत आहात तर तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. त्यामुळे चहाचे सेवन करावे लागणार आहे. 

अधिक वाचा - ICC क्रमवारीत रूटने घेतली मोठी झेप, कोहलीच्या अडचणीत वाढ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी