Drinking water while standing: उभं राहून कधीच पिऊ नका पाणी, होतात ‘हे’ चार दुष्परिणाम

पाण्याचं प्रमाण जितकं महत्त्वाचं असतं, तितकीच पाणी पिण्याची पद्धतही महत्त्वाची असते. चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचे आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होत असतात. अनेकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. मात्र तसं केल्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

Drinking water while standing
उभं राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उभं राहून पाणी पिण्यामुळे होतं शरीराचं नुकसान
  • फुफ्फुसं आणि हृदयावर होतो विपरित परिणाम
  • किडणीवरही येतो अतिरिक्त तणाव

Drinking water while standing: पाणी (Water) हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आपल्या शरीराचा बहुतांश भाग हा पाण्याने बनलेला असतो. त्याचप्रमाणे शरीराचं कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी पुरेसं पाणी (Enough water) पिण्याची आवश्यकता असते. आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणं कुठल्याही प्रौढ पुरुष आणि स्त्रीसाठी गरजेचं असतं. पाण्याचं प्रमाण जितकं महत्त्वाचं असतं, तितकीच पाणी पिण्याची पद्धतही महत्त्वाची असते. चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचे आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होत असतात. अनेकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. मात्र तसं केल्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो. उभं राहून पाणी पिल्याने वेळ वाचतो, हे खरं असलं तरी त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम (Side effects on health) हे गंभीर स्वरुपाचे असू शकतात. जाणून घेऊया, उभ्याने पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात. 

१. फुफ्फुसांचं नुकसान

जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता, तेव्हा आवश्यक ते पोषक घटक आणि जीवनसत्त्वं ही तुमच्या पचनसंस्थेत नीटपणे पोहोचत नाहीत. पाण्यासह हे सर्व घटक प्रमाणापेक्षा जास्त वेगाने तुमच्या सिस्टीममधून प्रवास करतात. त्यामुळे आपलं हृदय आणि फुफ्फुसं यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. उभ्याने पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर वरखाली होत असतो. 

२. अपचन

उभं राहून पाणी पिल्यामुळे पचनक्रियेवरही परिणाम होतो. जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो, तेव्हा ते प्रचंड वेगाने अन्ननलिकेतून पोटाच्या खालच्या भागापर्यंत वाहत जातं. ही बाब हानीकारक मानली जाते. उभं राहून पाणी पिण्याने आपल्या शिरांवर ताण येतो आणि वहनाचं संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे शरीरात विषारी घटक वाढतात आणि अपचनाची समस्या सुरु होते. 

अधिक वाचा - Beautiful Skin Tips : सुंदर त्वचेसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा या गोष्टी...

३. किडणीसंबंधी विकार

आपण जेव्हा बसलेल्या अवस्थेत असतो, तेव्हा आपली किडणी सर्वाधिक क्षमतेने काम करत असते, असं आतापर्यंत वेगवेगळ्या संशोधनातून दिसून आलं आहे. जेव्हा आपण उभ्याने पाणी पितो, तेव्हा ते पाणी फिल्टर न होता थेट पोटाच्या खालच्या भागात निघून जातं. त्यामुळे पाण्यातील अशुद्ध घटक मूत्राशयात जमा होतात. त्यामुळे पोट साफ करण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येऊ लागतात आणि किडणीवर तणाव येतो. त्यामुळे मूत्राशयाशी संबंधित विकार जडण्याची शक्यता असते. 

४. संधीवाताची शक्यता

जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो, तेव्हा शरीरातील नसांवर याचा तणाव येतो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक वाढतात. आपल्या सांध्यांमध्ये असणाऱ्या द्रव पदार्थाचा स्तरही त्यामुळे कमी होतो आणि संधीवात होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे सांधे आणि हाडं या दोन्हींवर वाईट परिणाम होतात. 

अधिक वाचा - Hair Care Tips: सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग करा हे सोपे घरगुती उपाय

पाणी पिण्याची योग्य पद्धत

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, बसून पाणी पिणे सर्वोत्तम मानले जाते. तुम्ही मांडी घालून जमिनीवर बसू शकता आणि खुर्चीवर बसूनही पाणी पिऊ शकता. पाणी पिताना ताठ बसा आणि हळूहळू पाणी प्या. त्यामुळे पोटही फुगणार नाही आणि इतर विकार दूर राहतील. 

डिस्क्लेरम - उभं राहून पाणी पिल्याने होणाऱ्या नुकसानाबाबतच्या सामान्यज्ञानावर आधारित असणाऱ्या या काही टिप्स आहे. तुम्हाला याबाबत काही प्रश्न वा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी