Side Effects of Holding Pee : कामाच्या गडबडीत अनेकदा लघवीला येऊनही त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. काहीजण प्रवासात असताना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे लघवी रोखून धरतात, तर काहीजण निव्वळ आळशीपणामुळे लघवीला जाणं टाळतात. कधी नाईलाजास्तव तर कधी सवयीचा भाग म्हणून लघवी रोखून धरण्याचे प्रकार अनेकांकडून होत असतात. मात्र हे प्रकार आरोग्यासाठी घातक असल्याचं दिसून आलं आहे. लघवी रोखून धरल्यामुळे तात्कालिक त्रास तर होतोच, मात्र आपल्या मूत्राशयावर आणि मलनिस्सारण संस्थेवर त्याचे अनेक विपरित परिणामही होतात.
सातत्याने लघवी रोखून धरण्याची सवय जडली तर ब्लॅडरची आकुंचन पावण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते. आपलं ब्लॅडर हे नैसर्गिकरित्या आकुंचन आणि प्रसरण पावण्याचं काम करत असतं. जेव्हा अधिक काळ लघवी साठवून ठेवण्याची वेळ येते तेव्हा ब्लॅडर प्रसरण पावतं आणि लघवी बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा आकुंचन पावतं. मात्र लघवी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढीस लागली तर मात्र आकुंचन पावण्याची ब्लॅडरची क्षमता कमी होऊ लागते. जर सातत्याने ब्लॅडर हे प्रसरण पावलेल्या अवस्थेत राहिलं, तर त्याची आकुंचित होण्याची वृत्ती कमी होते. याचे काही दुष्परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असते. ब्लॅडर आकुंचन पावलं नाही, तर त्यात साठलेली सगळी लघवी बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे लघवीला जाऊन आलं तरी सातत्याने लघवी लागल्याची भावना होत राहते. लघवी सातत्याने साठून राहिल्यामुळे ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. त्याचा दूरगामी परिणाम होऊन शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते.
अधिक वाचा - Fruits for weight loss : वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? ही फळं खाल्ली तर लवकर मिळेल फळ
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जास्तीत जास्त 2 कप लघवी शरीरात साठवणे योग्य आहे. त्यापेक्षा अधिक लघवी साठत असेल, तर लघवीला जाण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला दिला जातो. ज्यावेळी आपल्या शरीराचं ब्लॅडर 25 टक्के म्हणजेच एक चतुर्थांश भरतं, तेव्हा मेंदूला संकेत मिळतात आणि लघवीला जाण्याची भावना तयार होते. जर त्यानंतर लघवी केली नाही, तर युरिनमध्ये इन्फेक्शन होतं आणि युटीआयची (urinary tract infection) शक्यता बळावते. हा आजार अत्यंत वेदनादायी असतो आणि प्रत्येक वेळी लघवी करताना प्रचंड वेदनांचा सामना करावा लागू शकतो. जर यावर वेळीच उपाय केले नाहीत, तर गंभीर आजारात ही समस्या रुपांतरित होण्याची शक्यता असते.
लघवीशी संबंधित आजार टाळायचे असतील, तर नियमितपणे काही उपाय करणे गरजेचं आहे.