Kids Makeup : मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांचा मेकअप करताय? जाणून घ्या साईड इफेक्ट्स

लहान मुलांनी कितीही हट्ट केला तरी प्रत्येक वेळी त्यांना मेकअप करण्याची परवानगी देणे योग्य नाही. त्याचे अनेक साईड इफेक्ट्स होतात.

Kids Makeup
मुलांचा मेकअप करण्याचे साईड इफेक्ट्स  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलांचा मेकअप केल्यामुळे होतात साईड इफेक्ट्स
  • संवेदनशील त्वचा बनते रखरखीत
  • लिपस्टिकमुळे विषारी द्रव्ये शोषली जातात

Kids Makeup : लहान मुलांनी (Kids) एखादा हट्ट केला की तो पुरवण्यासाठी पालक लगेच तयार होतात. मुलांना जे हवं आहे ते मिळावं आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्यांनी रडू नये, असं अनेक पालकांचं म्हणणं असतं. त्यामुळे सहज शक्य असणाऱ्या अनेक गोष्टी मुलांना तातडीनं पुरवल्या जातात आणि त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र असं करताना आपण पुरवत असलेला हट्ट हा मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही, याचा विचार पालक करत नसल्याचं अनेकदा दिसून येतं. 

मुलांमध्ये मेकअपची क्रेझ

गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये मेकअप करण्याची (Make up) क्रेझ वाढत चालल्याचं चित्र आहे. विशेषतः शहरी भागात मेकअप करणाऱ्या मुलांची आणि मुलींची संख्या वाढताना दिसत आहे. छोट्यामोठ्या समारंभापासून ते मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला जाताना मुलांना मेकअप करण्याची इच्छा असते. विशेषतः शहरी भागात याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. मुलं ही घरातील इतर व्यक्तींना मेकअप करताना पाहत असतात. आपली आई, आज्जी, थोरली बहीण, आत्या, मावशी यापैकी कुणी वारंवार मेकअप करत असेल, तर त्याचा प्रभाव लहान मुलांवरही पडतो आणि मेकअपसाठी मुलं हट्ट करू लागतात. मात्र मुलांना जर मेकअप केला, तर त्यांच्या कोवळ्या त्वचेवर त्याचे अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. 

त्वचेचं होतं नुकसान

लहान मुलांची त्वचा ही मउ आणि संवेदनशील असते. जर त्यावर केमिकलयुक्त पदार्थांचा मारा केला, तर त्यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. मेकअपमुळे मुलांच्या अंगाला खाज सुटणे, त्वचेवर ओरखड्यासारखे व्रण उठणे, जळजळणे असे त्रास व्हायला सुरुवात होते. 

अधिक वाचा - Healthy Diet : खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवतील चिरतरूण, आजपासून या गोष्टी सुरू करा

शरीरात जातात टॉक्सिन्स

मुलांनी हट्ट केल्यामुळे वारंवार जर तुम्ही लिपस्टिक लावत असाल, तर त्यामुळे मुलांना पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांची पचनशक्ती 10 टक्के अधिक असते. त्यामुळे कुठलेही पदार्थ ते अधिक वेगाने शोषून घेऊन पचवू शकतात. लिपस्टिकमधूून पोटात जाणारी विषारी द्रव्यं त्यांच्या शरीरात मिसळून त्यांना विकार होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे त्वचेत लिपस्टिकमधील विषारी द्रव्यं शोषली जाऊ शकतात. 

अधिक वाचा - Gym After Surgery : हार्ट सर्जरीनंतर जिमला जाणं धोकादायक! चुकूनही घालू नका जीव धोक्यात

त्वचा कोरडी पडण्याची शक्यता

सतत मेकअप केल्यामुळे मुलांची त्वचा कोरडी पडण्याचीही शक्यता असते. सतत मेकअप करणारी मुलं हळूहळू आपलं अंग खाजवत असल्याचं दिसू लागतं. त्यामुळेच मुलांना मेकअप करण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. 

डिस्क्लेमर - मुलांना मेकअप केल्यामुळे होणारे हे साधारण साईड इफेक्ट्स आहेत. याबाबत तुम्हाला काही गंभीर समस्या असेल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी