Bath in Monsoon : पावसाळ्यात अंघोळीला नका मारू दांडी, होतील भयंकर दुष्परिणाम, वाचा सविस्तर

पावसाळ्यात पाणी कमी पिणे आणि अंघोळ टाळणे याकडे अनेकांचा कल असतो. मात्र याचे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

Bath in Monsoon
पावसाळ्यात अंघोळीला दांडी मारण पडेल महागात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पावसाळ्यात अनेकजण मारतात अंघोळीला दांडी
  • त्वचा चिकट होऊन अनेक दुष्परिणामांना आमंत्रण
  • अंघोळ न टाळण्याचा दिला जातो सल्ला

Bath in Monsoon : पावसाळ्यात (Monsoon) अनेकजण अंघोळीला दांडी (skipping bath) मारण्याच्या मूडमध्ये असतात. पावसाळा सुरू झाला की पहिल्या काही पावसांत मनसोक्त भिजणं, गरमारम भजी आणि वड्यांच्या सोबतीनं चहाचा आनंद घेणं अनेकांना आवडतं. मात्र जसजसा पाऊस नेहमीचा होतो, तसतसा त्याचा अनेकांना वैताग येऊ लागतो. पावसाळ्यातील वातावरण उन्हाळ्याच्या तुलनेत थंड असतं. त्यामुळे अनेकांना या काळात तहान लागत नाही. पाणी पिण्याचं टाळल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक विकार जडण्याची शक्यता असते. तर अनेकजण अंधोळ करायलाही टाळाटाळ करताना दिसतात. कधी एखादा दिवस अंघोळीला दांडी मारणे किंवा रात्रीच्या वेळी अंघोळ करायचं टाळणे असे प्रकार सुरु होतात. मात्र पावसाळ्यात अंघोळीला दांडी मारणं महागात पडू शकतं, असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. जाणून घेऊया, अंघोळीला दांडी मारण्याचे नेमके काय दुष्परिणाम होऊ शकतात. 

इन्फेक्शन होण्याची शक्यता

आपल्या शरीरावर कुठल्याही ऋतुत मोठ्या प्रमाणात जीवजंतू बसतात. रोजच्या रोज अंघोळ केल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि संक्रमण होण्यापूर्वीच हे जीवजंतू धुऊन टाकले जातात. त्वचेवर असणाऱ्या अनेक मृत पेशींची त्यामुळे सफाई होते. मात्र सातत्याने अंघोळ टाळली तर या पेशी त्वचेवरच साठून साठून काही काळाने इन्फेक्शनचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते.

दुर्गंधी

पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही घरात असा किंवा घराबाहेर. प्रत्येक ठिकाणी बाष्प साठण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे वाळत घातलेले कपडेदेखील थोडेफार ओलसर असल्याचं आपल्याला जाणवतं. याच कारणामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येण्याची शक्यता निर्माण होते. नियमित अंघोळ करून हा प्रकार टाळता येऊ शकतो.

अधिक वाचा - Infertility Problem : अनेक प्रयत्नांनीही होत नाहीय मूल? या तेलांनी पडेल फरक

त्वचेचं इन्फेक्शन

नियमित अंघोळ करणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेचं आरोग्य अंघोळीला दांडी मारणाऱ्यांच्या तुलनेत चांगलं असल्याचं रिसर्चमधून दिसून आलं आहे. अंगाला सूज येण्याची समस्याही नियमित अंघोळ केल्यामुळे कमी होते. अंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत आणि नियंत्रित राहायलाही मदत होत असल्याचं सांगितलं जातं. 

रोगप्रतिकारक शक्ती कमी

अंघोळ केली नाही, तर शरीरावर व्हायरस आणि बॅक्टेरिया यांचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्याशी लढण्यात वाया जाते. त्यामुळे गरजेच्या वेळी या शक्तीचा उपयोग होऊ शकत नाही. 

अधिक वाचा - Bad Cholesterol signs: उच्च कोलेस्टेरॉलचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? ही तीन लक्षणे जाणून घ्या

चिकटपणा

अंघोळ न केल्यामुळे त्वचेला चिकटपणा येतो. हवेत बाष्प अधिक असल्यामुळे त्वचा पावसाळ्याच्या काळात अधिकच चिकट होते. त्यामुळे चिडचिड वाढण्याची शक्यताही असते. 

डिस्क्लेमर - यात आरोग्याबाबत कुठलाही दावा करण्यात आलेला नसून अंघोळ करण्याचे सामान्य फायदे नमूद करण्यात आले आहेत. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कुठलीही समस्या असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपाय करण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी