COPD symptoms: ‘ही’ लक्षणं म्हणजे फुफ्फुसं निकामी झाल्याचे संकेत, स्मोकिंग करणाऱ्यांसाठी इशारा

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज (COPD) हा त्यापैकी एक गंभीर आजार मानला जातो. या आजारात फुफ्फुसाकडे जाणारे आणि येणारे वायूमार्ग दबले जातात. त्यामुळे शरीरातून कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडत नाही. हा वायू शरीरातच साठून राहतो आणि आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम दिसायला सुरुवात होते.

COPD symptoms
‘ही’ लक्षणं म्हणजे फुफ्फुसं निकामी झाल्याचे संकेत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सीओपीडी हा फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार
  • स्मोकिंग करणाऱ्यांना आणि गांजा ओढणाऱ्यांना सर्वाधिक धोका
  • सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसताच उपचार केले तर पूर्ण बरे होण्याची शक्यता

COPD symptoms: फुफ्फुसाशी (Lungs) संबंधित अनेक आजार हे वेगवेगळ्या कारणाने होत असतात. काही आजार हे तात्पुरत्या स्वरुपाचे असतात, तर काही आजार गंभीर स्वरुपाचे असतात. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज (COPD) हा त्यापैकी एक गंभीर आजार मानला जातो. या आजारात फुफ्फुसाकडे जाणारे आणि येणारे वायूमार्ग दबले जातात. त्यामुळे शरीरातून कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडत नाही. हा वायू शरीरातच साठून राहतो आणि आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम दिसायला सुरुवात होते. श्वास घेण्यास त्रास होणे, हे त्याचं प्राथमिक लक्षण असतं. 

दीर्घकाळ खोकला राहणे, मोठ्या प्रमाणावर कफ बाहेर पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, विनाकारण वजन कमी होणे ही सीओपीडीची प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर या आजाराचा शोध लागला, तर त्यावर उपचार करता येणं शक्य असतं. मात्र हा आजार बळावला तर फुफ्फुसांचा कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित इतर आजार होण्याची शक्यता अधिक असते. 

महिलांना अधिक धोका

पुरुषांच्या तुलनेत महिलांना या आजाराचा अधिक धोका असल्याचं दिसून आलं आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची फुफ्फुसं छोटी असतात. सिगरेट किंवा इतर प्रकारच्या धुराचा त्यावर लवकर परिणाम होतो. ॲस्ट्रोजन या घटकाचादेखील यात मोठा वाटा असतो. ऑक्सिजन थेरपी आणि औषधोपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. या आजाराच्या लक्षणांवर लक्ष देणे आणि वेळीच ती ओळखणे यासाठी आवश्यक असते. 

क्रॉनिक कफ

दीर्घकाळ खोकला आणि कफ हे आजाराचं प्रमुख लक्षण मानलं जातं. अशा व्यक्तींना दिवसभर सतत खोकल्याचा त्रास होत राहतो. जर आठ आठवड्यांपेक्षाही जास्त काळ खोकला राहिला, तर तो सीओपीडीचं लक्षण असण्याची शक्यता मानली जाते. 

अधिक वाचा - थंडीत खा हे 5 पदार्थ आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवा

पिवळा कफ

फारच जास्त प्रमाणात कफ बाहेर पडणं, हे या आजाराचं दुसरं लक्षण असतं. जर तुमच्या घशातून पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा कफ बाहेर पडत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. 

श्वास घेण्यास त्रास

सीओपीडीचं तिसरं लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे. थोडं जास्त चालल्यामुळे किंवा चढाई केल्यामुळे पूर्ण दिवसभर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल, तर ही सीओपीडीचं लक्षण मानलं जातं. 

विनाकारण वजन कमी होणे 

कुठल्याही कारणाशिवाय आपोआप तुमचं वजन कमी होणं, हेदेखील या आजाराचं एक लक्षण मानलं जातं. तुमचं वजन तर विनाकारण कमी होत असेल, तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याची गरज आहे. 

अधिक वाचा - Heel Pain : टाचदुखीने त्रस्त झाला आहात का? मग हे घरगुती उपाय देतील झटक्यात आराम

तंबाखुचे सेवन टाळा

तंबाखु किंवा तंबाखुजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा सर्वाधिक त्रास होण्याची शक्यता असते. जास्त स्मोकिंग कऱणाऱ्या व्यक्तींनाही हा आजार जडू शकतो. सिगार आणि गांजा ओढणारेही या आजाराला बळी पडू शकतात. 

डिस्क्लेमर - सीओपीडीची लक्षणे आणि कारणे याबाबतची ही काही सामान्यज्ञानावर आधारित माहिती आहे. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या वा प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी